कासेवाडीतील सराईत गुंड तडीपार

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – लोकसभा निवडणुकीच्या पाश्र्वभूमीवर भवानी पेठेतील कासेवाडी परिसरातील सराईताला पुणे शहर आणि जिल्ह्यातून १ वर्षासाठी तडीपार करण्याचे आदेश पोलीस उपायुक्त सुहास बावचे यांनी दिले आहेत.

गणेश सतीश जाधव (वय २०,रा. कासेवाडी, भवानी पेठ) असे तडीपार करण्यात आलेल्या गुंडाचे नाव आहे.

जाधव हा भवानी पेठेतील कासेवाडी परिसरातील सराईत गुन्हेगार आहे. त्याच्याविरोधात घरफोडी, दरोडा घालण्याची तयारी, दहशत करणे असे गंभीर गुन्हे दाखल आहेत. त्याला शहरातून तडीपार करण्याचा प्रस्ताव सहाय्यक आयुक्त प्रदीप आफळे यांच्या मार्गदर्शनाखाली खडक पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र मोकाशी, गुन्हे शाखेचे निरीक्षक उत्तम चक्रे, उपनिरीक्षक रत्नदीप गायकवाड यांनी तयार केला होता. तो परिमंडळ एकचे पोलीस उपायुक्त सुहास बावचे यांच्याकडे पाठविण्यात आला. त्यांनी जाधव याला शहर व जिल्ह्यातून एक वर्षांसाठी तडीपार करण्याचे आदेश दिले.