अमली पदार्थांची विक्री करणाऱ्याला बिबवेवाडी पोलीसांकडून अटक

 पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – बिबवेवाडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत अमली पदार्थांची विक्री करणाऱ्या इसमास सापळा रचून ताब्यात घेऊन त्याच्या जवळील 62 हजार 440 रुपये किमतीचा तीन किलो 122 ग्रॅम वजनाचा गांजा व मुद्देमाल हस्तगत करण्यात आला.

बिबवेवाडी परिसरा मध्ये 20 मे 2019 रोजी पोलीस हवालदार रवी चिप्पा यांना त्याच्या बातमीदाराकडून मिळालेल्या बातमीनुसार अप्पर बस स्टॉप,बिबेवाडी,पुणे येथे 25 वर्षे इसम त्यांच्या अंगामध्ये कळ्या रंगाचा टि शर्ट,जीन्स पॅन्ट घातलेला त्यांना डोक्याचे केस बांधले असा वर्णन केलेला ईसन आमली पदार्थ विकण्यासाठी येथे येणार आहे.

अशी खात्रीशीर माहिती मिळताच. सदर बातमीचा सारांश घेऊन बिबवेवाडी पोलिस ठाण्यातील पोलिस निरीक्षकांना सांगून तसेच माजी पोलीस उपायुक्त परिमंडळ 5 यांना कळवून त्यांच्या आदेशान्वये पोलीस निरीक्षक मुरलीधर करपे यांनी पोलीस स्टेशन कडील स्टाफचा मदतीने सापळा रचून भीम राजू कांबळे(वय 26, राहणार. खटकेवस्ती,महावीर गार्डन समोर,डॉल्फिन चौक,अप्पर बस स्टॉप,बिबवेवाडी,पुणे) याला ताब्यात घेऊन त्याची झडती घेतली असता.

त्याच्या जवळ 62 हजार 440 रुपये किमतीच्या तीन किलो 122 ग्रॅम वजनाचा गांजा अमली पदार्थ व रोख रक्कम अनाधिकाराने बेकायदेशीररित्या बाळगताना मिळून आल्याने त्याच्यावर एन.डी.पी.एस अँक्ट प्रमाणे कायदेशीर कारवाई करण्यात आली.

सदरची कामगिरी,पोलिस उपायुक्त परिमंडळ 5 पुणे शहर प्रकाश गायकवाड,सहाय्यक पोलीस आयुक्त वानवडी विभाग पुणे शहर मिलिंद पाटील,बिबवेवाडी पोलीस निरीक्षक मुरलीधर करपे यांच्या मार्गदर्शनानुसार व सूचनेप्रमाणे सहायक पोलिस निरीक्षक किरण पावसे,पोलीस हवलदार रवी चिप्पा,पोलीस शिपाई शिंदे,कुलकर्णी,राख यांनी केली.सदर गुन्ह्याचा पुढील तपास,बिबवेवाडी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक किरण पावसे करीत आहेत.