सराईत गुन्हेगार पुणे शहर, जिल्ह्यातून हद्दपार

पुणे  :  पोलीसनामा ऑनलाईन

भारती विद्यापीठ आणि सांगवी पोलीस ठाण्यात गंभीर गुन्हे दाखल असलेल्या सराईत गुन्हेगाराला पुणे शहर आणि जिल्ह्यातून एक वर्षासाठी हद्दपार करण्यात आले आहे. सराईत गुन्हेगाराला हद्दपार करण्याचे आदेश परिमंडळ -२ चे पोलीस आयुक्त बच्चन सिंग यांनी शुक्रवारी (दि.१४) दिले.

[amazon_link asins=’B019MQLUZG’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’73a27887-b8e1-11e8-a560-1be18fadf545′]

मोहन लक्ष्मण राठोड (वय-२५ रा. सुंदरनगर मांगडेवाडी, कात्रज) असे हद्दपार केलेल्या सराईत गुन्हेगाराचे नाव आहे. मोहन राठोड हा सराईत गुन्हेगार असून त्याची सांगवी आणि भारती विद्यापीठ पोलीस ठाण्याच्या हद्दीत दहशत आहे. त्याच्यावर घरफोडी, दरोडा तयारी, जाळपोळ, जखमी करुन जबरी चोरी करणे, दहशत पसरवणे असे गंभीर गुन्हे दोन्ही पोलीस ठाण्यात दाखल आहेत. नागरिकांनी हद्दपार मोहन राठोड शहरात किंवा परिसरात दिसून आल्यास नजीकच्या पोलीस ठाण्याशी संपर्क साधण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे.

समलिंगी कायद्याला मान्यता मात्र अपमान जैसे थे; ‘गे’ कर्मचाऱ्याचा बॉसकडून छळ