औरंगाबाद-जालना रस्त्यावर ‘क्रुझर’ जीप उभ्या ट्रेलरवर धडकली, 4 भाविकांचा जागीच मृत्यू

औरंगाबाद : पोलीसनामा ऑनलाइन – औरंगाबाद जालना रोडवर उभ्या असलेल्या ट्रेलरवर वेगाने आलेल्या क्रुझरने धडक दिल्याने झालेल्या भीषण अपघातात चार जणांचा जागीच मृत्यु झाला. या अपघातात ९ जण जखमी झाले आहेत.

औरंगाबाद जालना रस्त्यावरील करमाडजवळ पहाटे हा अपघात झाला. एका क्रुझरमधून सिंदखेडराजा येथील भाविक देवदर्शन करुन बुलढाण्याकडे जात होते. त्यावेळी करमाडजवळ रस्त्यात एक ट्रेलर उभा होता. क्रुझर चालकाला रात्रीच्यावेळी रस्त्यात उभा असलेला हा ट्रेलर दिसला नाही.

त्याने वेगाने ट्रेलरला पाठीमागून धडक दिली. त्यात क्रुझरच्या पुढे बसलेल्या चारही जणांचा जागीच मृत्यु झाला. अन्य ९ जण जखमी झाले असून त्यांना घाटी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.