आगामी 24 तासात ‘बुलबुल’ चक्रीवादळ धडकणार, प्रशासनाचा ‘इशारा’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – ‘महा’ या तीव्र चक्रीवादळाचा धोका आता होताना दिसत आहे, तर बंगालच्या उपसागरात ‘बुलबुल ‘चक्रीवादळ तीव्र होण्याची शक्यता आहे. पुढील 24 तासात या वादळाचे परिणाम पाहायला मिळतील, अशी शंका भारतीय हवामान खात्याने व्यक्त केली आहे.

बुलबुल वादळ ताशी 6 किमी वेगाने उत्तरेकडे सरकत आहे. बुलबुल पश्चिम बंगाल आणि बांगलादेशच्या दिशेने जाऊ शकते. अंदमानात येत्या 24 तासात जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे. बंगालच्या उपसागरात हे नवीन चक्रीवादळ तयार होत आहे. यंदाचे हे 7 वे चक्रीवादळ असेल. याची तीव्रता वाढत जाणार असून 10 नोव्हेंबरपर्यंत त्याचा प्रभाव कायम राहील.

‘महा’ चक्रीवादळ ‘-

हवामान विभागाने चक्रीवादळ ‘महा’ हे अत्यंत तीव्र वादळाच्या श्रेणीत गणले आहे. हे वादळ ताशी 21 किलोमीटर वेगाने सतत वाढत आहे. हे आता गुजरातमधील पोरबंदरपासून 480 किमी अंतरावर आहे. त्याच वेळी, गुजरातमधील वेरावळ आणि दीवपासून ते 570 किमी अंतरावर आहे. येत्या 24 तासात हे वादळ गुजरात आणि दीव किनारपट्टीच्या भागात पोहचेल.

मच्छिमारांना इशारा –

वादळाची गती ताशी 80 किलोमीटर असेल आणि 90 किलोमीटर वेगाने वारे वाहतील. 6 ते 8 नोव्हेंबर दरम्यान अरबी समुद्रात जोरदार लाटा वाढण्याची शक्यता आहे. गुजरात आणि महाराष्ट्रातील मच्छिमारांनी समुद्रात जाऊ नये असा इशारा देण्यात आला आहे. तथापि, 8 नोव्हेंबरपर्यंत हे वादळ हळूहळू कमकुवत होईल, अशी माहिती हवामान खात्याने दिली आहे.

वादळाची गती

8 नोव्हेंबर: 110 ते 130 Km / h
9 नोव्हेंबर: 125 ते 140 Km / h
10 नोव्हेंबर: 130 ते 140 Km / h

‘फनी’ चक्रीवादळ

ओडिशामध्ये ‘बुलबुल’ची भीती सध्या दिसत आहे. हे वादळ ओडिशात किंवा पश्चिम बंगालमध्ये कोणत्या ठिकाणाहून येईल हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. तरीही सावधगिरीचा इशारा म्हणून ओडिशाच्या सर्व बंदरांवर धोक्याचा इशारा देण्यात आला आहे. काही महिन्यांपूर्वी ओडिशाला फनी चक्रीवादळाचा सामना करावा लागला होता.

Visit : Policenama.com