दाभोलकर हत्याप्रकरण : अ‍ॅड. पुनावळेकर व भावे यांच्या विरोधात पुरवणी दोषारोपपत्र दाखल

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – अनिसचे कार्याध्यक्ष डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्या प्रकरणीत आज केंद्रीय अन्वेषण विभागाने (सीबीआय) बुधवारी अ‍ॅड. पुनावळेकर व भावे यांच्या विरोधात पुरवणी दोषारोपपत्र दाखल केले. दाखल केलेल्या दोषारोपत्रातून या प्रकरणातील हत्यार शरद कळसकर याला अ‍ॅड. संजीव पुनाळेकर यांनी गुन्ह्यातील शाश्त्र नष्ट करण्याचा सल्ला दिला होता.

तर विक्रम भावे याने कळसकर आणि सचिन अंदुरेसह घटनास्थळाची रेकी केल्याचे या दोषारोपपत्र स्प्ष्ट झाले आहे. विशेष न्यायाधीश एस. आर. नावंदर यांच्या न्यायालयात पुरवणी दोषारोपपत्र दाखल करण्यात आले आहे.

डॉ. दोभालकर यांच्यावर गोळ्या झाडणाऱ्या कळसकरला गुन्ह्यातील शस्त्र नष्ट करण्याचा सल्ला पुनाळेकर यांनी दिला. ठाणे येथील खाडी पुलावरून अ‍ॅड. पुनावळेकर याने शस्त्र तुकडे करून फेकून दिले. तर भावे याने घटनास्थळाची रेकी करण्यास मदत केली.

हत्येनंतर कसे फरार व्हायचे याबाबत कळसकर व अंदुरे यांना मार्गदर्शन केल्याचे सीबीआयने दोषारोपपत्र म्हटले आहे. कळसकर याने दुसऱ्या प्रकरणाच्या तपासात दिलेल्या कबुलीजबाबावरून अ‍ॅड. पुनाळेकर आणि भावे यांना मे महिन्यात अटक करण्यात आली होती. अ‍ॅड. पुनाळेकर यांना जमीन देण्यात आला आहे तर भावे अद्याप न्यायालयीन कोठडीत आहे. कळसकर याची न्यायवैद्यकीय चाचणी घेण्यात आली तेव्हा चाचणीत मी आणि साथीदार अंदुरेने डॉ. दाभोलकर यांच्यावर गोळीबार केल्याची माहिती कळसकरने सीबीआय दिली होती.

3 सप्टेंबर 2016 डॉ. वीरेंद्रसिंग तावडे व त्यानंतर 19 फेब्रुवारी 2019 रोजी शरद कळसकर व सचिन अंदुरे यांच्याविरोधात दुसरे दोषारोपपत्र दाखल करण्यात आले होते.

Visit :  Policenama.com