‘डान्सिंग डायल 108’ ! रूग्णवाहिकेतच सुरू झालं होतं अश्लील ‘काम’, व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर ‘बोंबाबोंब’

लखनौ : वृत्तसंस्था – कोरोनाच्या काळात रुग्णवाहिकांची आणि वैद्यकीय क्षेत्राचं काम मोठ्या प्रमाणावर वाढलं आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर वैद्यकीय क्षेत्राकडून होत असलेल्या कामाचे सर्वत्र कौतूक होत असताना लौखनौमध्ये याला गालबोट लागले आहे. सरकारी रुग्णवाहिकेतील 17 सेकंदाचा आपत्तीजनक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. हा व्हिडीओ उत्तर प्रदेशातील रामपूर जिल्ह्यातील असून घटनेचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर कंपनीने कारवाई करून रुग्णवाहिका चालकाला तात्काळ कामावरून कमी केले आहे.

रामपूर जिल्ह्यातील जिल्हा सरकारी रुग्णालयात वापरात येणारी रुग्णवाहिका जीव्हीके कंपनीद्वारे अधिग्रहित केली जाते. या रुग्णवाहिकेतील कंपनीच्या एका कर्मचाऱ्याचा आपत्तीजनक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. व्हायरल व्हिडिओत शासकीय कर्मचाऱ्यारी एका महिलेसोबत रुग्णवाहिकेत दिसून येत आहे. सोशल मीडियावरील व्हायरल व्हिडिओनंतर प्रशासनाचे तातडीने याची दखल घेतली. या घटनेची माहिती संबंधित कंपनीला देण्यात आली. कंपनीने या कर्मचाऱ्यावर कारवाईचा बडगा उगारत तात्काळ कामावरुन कमी केले.

जिल्हा शल्य चिकित्सकांच्या म्हणण्यानुसार, रुग्णवाहिकेच्या कर्मचाऱ्यावर कारवाई करण्याची जबाबदारी ही संबंधित कंपनीची आहे. कर्मचाऱ्यावर कोणती कारवाई करायची हे कंपनीने ठरवायचे आहे, असे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सांगितले. मुख्य वैद्यकीय अधिकारी सुबोध कुमार शर्मा यांनी सांगितले की, एका रुग्णवाहिकेत काही लज्जास्पद काम करतानाचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. यासाठी जीबीके कंपनीला लेखी तक्रार केली आहे.