इस्लाम कबुल कर ! PAK क्रिकेटर दानिश कनेरियानं सांगितलं ‘हिंदू असल्याचा गर्व, हिंदूच राहणार’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था : पाकिस्तानचा माजी लेगस्पिनर दानिश कनिरिया पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. 39 वर्षीय कनेरिया सोशल मीडियावर सक्रिय आहे. यावेळी, एका महिला प्रशंसकाने त्याला इस्लाम धर्म स्वीकारण्याचे आवाहन केले. त्यांनी म्हंटले की, इस्लामशिवाय जीवन काहीच नाही. यावर , ट्विटरवर #AskDanish सत्रात, कनेरियाने त्याच्या चाहत्याला प्रत्युत्तर देण्यासाठी फारसा वेळ घेतला नाही आणि असं लिहिलं की, बर्‍याच जणांनी तुमच्याप्रमाणे हा प्रयत्न केला पण त्यांना त्यात यश आले नाही. एवढेच नव्हे त्याने पुढे लिहिले कि, गर्व आहे मला हिंदू असल्याचा’

वास्तविक, आमना गुल नावाच्या वापरकर्त्याने दानिश कनेरियाला लिहिले- ‘तुम्ही इस्लाम स्वीकारला पाहिजे. इस्लाम सर्वकाही आहे. मला माहित आहे की इस्लामशिवाय जीवन काहीच नाही. तुमचे जीवन मृत्यूसारखे आहे तुम्ही इस्लामचा स्वीकार करा ‘

मग एका वापरकर्त्याने कनेरियाला विचारले की तुम्हाला पाकिस्तानात सुरक्षित वाटत नाही ..? कानेरियाने उत्तर दिले- ‘मी इथे पूर्णपणे सुरक्षित आहे. मी म्हणालो की काही लोकांनी प्रयत्न केला. शब्दांसह खेळू नका.

दरम्यान, गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये दानिश कनिरिया चर्चेत आला होता, तेव्हा पाकिस्तानचा माजी वेगवान गोलंदाज शोएब अख्तरने दावा केला होता की, काही पाकिस्तानी क्रिकेटपटूही कनेरिया हिंदू असल्याने त्याच्यासोबत खायला तयार नसतात. मात्र अखेर अख्तर यांनी स्पष्टीकरण दिले की कनेरियासंदर्भातील त्यांचे विधान चुकीचे आहे.