दौंडमध्ये मतदानास संमिश्र प्रतिसाद.. मोठ्या गावांमध्ये कमी, तर छोट्या गावांमध्ये चांगला प्रतिसाद

दौंड : पोलीसनामा ऑनलाईन (अब्बास शेख ) – दौंड तालुक्यामध्ये अनेक ठिकाणी मतदानाला संमिश्र असा प्रतिसाद मिळताना दिसत आहे.

दुपारी साडेतीन वाजेपर्यंत अनेक मोठ्या गावांमधील  मतदानाची टक्केवारी हि 35 ते 40 टक्क्यांच्या आसपास होती तर छोट्या गावांमध्ये हीच टक्केवारी 50 टक्क्यांच्या पुढे  नोंदवण्यात आली आहे. आज मतदानाच्या दिवशी सकाळ पासूनच मतदारांनी मतदान केंद्रांकडे पाठ फिरवल्याचे दिसत होते. ही परिस्थिती दुपार नंतर बदलेल असे वाटत होते परंतु सायंकाळी साडेचार वाजेपर्यंत परिस्थिती जैसे थे असल्याचे पहायला मिळाले. मतदानाची आकडेवारी पाहता मतदारांमध्ये निरुत्साहच दिसून येत आहे. निरुत्साहाचे कारण मात्र अजूनही गुलदस्त्यामध्ये आहे.