आ. राहुल कुल यांच्याकडून सीटबेल्टबाबत जनजागृती, कार्यकर्त्यांनी देखील केलं अनुकरण

दौंड : पोलीसनामा ऑनलाइन (अब्बास शेख) – दौंड चे आमदार राहुल कुल हे विविध विकासमांच्या पाठपुरावा करणे आणि कामे मंजूर करून आणणे यामुळे कायमच चर्चेत असतात. परंतु सध्या ते अजून एका विषयामुळे पुन्हा चर्चेत आले असून कार्यकर्त्यांच्या चाणाक्ष नजरेमुळे त्यांचा हा एक गुण सर्वांसमोर आला आहे.

आ.कुल हे तालुक्यात प्रवास करत असताना ते आपल्या चारचाकी गाडीत बसल्यानंतर नियमितपणे सीटबेल्ट लावतात त्यांना याची इतकी सवय लागली आहे की त्यांना अर्धा किलोमीटर जरी प्रवास करायचा असला तरी ते न विसरता सीटबेल्ट लावून मगच प्रवास करतात त्यामुळे या गोष्टीची चर्चा मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते करताना दिसतात आणि तेही या गोष्टीचे अनुकरण करू लागल्याने त्यांचा प्रवासही सुरक्षित होऊ लागल्याचे ते आवर्जून सांगतात. नुकताच कुल यांच्या कार्यकर्त्याने त्यांचा एक किस्सा सांगताना शनिवारी मोठी लग्न तिथ असल्याने आमदार राहुल कुल हे विविध लग्न समारंभांना भेटी देत होते.

यावेळी आमदार कुल गाडीतून उतरताना सीटबेल्ट काढत असल्याचे काही कार्यकत्यांनी दिसले त्यांनी दादा आपण खेडेगावातही सीटबेल्ट वापरता ?? अश्या प्रश्नात्मक नजरेने पाहून त्यांना त्याबाबत प्रश्न विचारला यावेळी आ. कुल यांनी स्मितहास्य करत सीट बेल्ट आपल्या सुरक्षा करता आहे आणि तो गाडीत बसल्यानंतर प्रत्यकाने वापरला पाहिजे असे सांगत जमलेल्या कार्यकर्त्यांना सुरक्षिततेचा आणि त्याची सवय लावून घेण्याचा सल्ला दिला. सध्या रस्ता सुरक्षा सप्ताह ही सुरू असल्याने महामार्गावर ठिकठिकाणी पोलीस वाहने चालवताना कोणती काळजी घ्यावी याबाबत मार्गदर्शन करत आहेत त्यातच आमदार कुल यांनी देखील सीटबेल्ट वापराचे महत्त्व सांगितल्याने कार्यकर्त्यांनी सीटबेल्ट वापर सुरू केल्यास वाहन चालवताना होणारे नुकसान टाळता येईल हे मात्र नक्की आहे.

फेसबुक पेज लाईक करा –