दौंड : केडगाव येथील हॉटेलमध्ये गॅसचा ‘स्फोट’, दोनजण गंभीर जखमी

दौंड :पोलीसनामा ऑनलाइन (अब्बास शेख) – दौंड तालुक्यातील केडगाव चौफुला रस्त्यावर असणाऱ्या बिर्याणी दरबार या हॉटेलमध्ये आज दुपारी 2 वाजता गॅसचा स्फोट होऊन दोनजन जबर जखमी झाले आहेत.

जखमींमध्ये या हॉटेलचा आचारी छोटू आणि पिंपळगाव येथील शहाबुद्दीन सय्यद हे जबर जखमी झाले.
स्फोटाचा भीषण आवाज ऐकून शेजारी असणाऱ्या नागरिकांनी जखमींना हॉटेलमधून बाहेर काढून रुग्णालयात भरती केले आहे.

फेसबुक पेज लाईक करा : https://www.facebook.com/policenama/