राफेल, भ्रष्टाचार, नोटबंदी यापैकी कोणत्याही विषयावर माझ्याशी चर्चा करा

राहुल गांधी यांचे नरेंद्र मोदींना आव्हान

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – लोकसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान सर्वच पक्ष एकमेकांवर कुरघोडी करू पाहत आहेत. काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी सातत्याने पंतप्रधान नरेंद्र मोदींना लक्ष करत आहेत. राहुल गांधी यांनी नरेंद्र मोदींना राफेल विमान खरेदी, नीरव मोदी आणि अमित शाह- नोटाबंदी यापैकी कोणत्याही विषयावर माझ्यासोबत चर्चा करून दाखवा, असे आव्हान राहुल गांधी यांनी नरेंद्र मोदी यांना दिले आहे. राहुल गांधी यांनी दिलेले हे आव्हान नरेंद्र मोदी स्वीकारतात का, ते पाहणे औत्सुक्याचे ठरेल.

राहुल गांधी यांनी म्हटले आहे की, प्रिय, पंतप्रधान, तुम्ही देशातल्या भ्रष्टाचारावर माझ्या सोबत चर्चा करण्यास घाबरत आहात का? मी तुमच्यासाठी हे काम सोपं करतो. पुस्तक उघडून तुम्ही या विषयांचा अभ्यास करायला सुरुवात करा. पहिला धडा – राफेल+अनिल अंबानी, दुसरा धडा – निरव मोदी आणि तिसरा धडा – अमित शाह + नोटबंदी.

राहुल गांधी यांचा दावा आहे की, “राफेल व्यवहारादरम्यान उद्योगपती अनिल अंबानीला फयदा मिळवून देण्यासाठी भ्रष्टाचार करण्यात आला आहे”. तर नीरव मोदी हा भामटा पंजाब नॅशनल बँकेला चुना लावून पळून गेला आहे. तसेच काँग्रेस नोटबंदीलादेखील एक मोठा घोटाळा मानते. त्यामुळेच राहुल यांनी या तीन विषयांवर मोदींना चर्चा करण्याचे आव्हान केले आहे.

https://twitter.com/RahulGandhi/status/1115527031670751232