आषाढी एकादशी : विठ्ठल-रूक्मिणीला फळाफुलांची आरास

पोलीसनामा ऑनलाईन टीम : पंढरपुरातील श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर गाभाऱ्यातील सजावट ही बदलत्या ऋतुचक्रानुसार केली जाते. येथील सजावटीतमधून प्रत्येक ऋतूच महत्व दिसून येतं.

१. यावर्षीच्या सुरवातीपासून पंढरीतील श्री विठ्ठल-रुक्मिणीच्या मंदिरातील ज्या प्रकारे सजावट करण्यात आली, त्याची नयनरम्य दृश्ये आपण पाहणार आहोत.

नवीन वर्षाच्या सुरुवातीला श्री विठ्ठल आणि रुक्मिणी मातेच्या गाभाऱ्यात आकर्षक अशा ब्ल्यू डायमंड नावाच्या फुलांनी आरास केली. या फुलांच्या आकर्षक सजावटीमध्ये सावळ्या विठुरायाचे लोभस रूप अधिकच खुलून दिसून आले.

२. श्री विठ्ठल -रुक्मिणी मातेच्या गाभाऱ्यात नवीन वर्षाच्या सुरवातीला आकर्षक अशा ब्लु डायमंड नावाच्या फुलांनी आरास केली. या फुलांच्या आकर्षक सजावटीमध्ये सावळ्या विठुरायाचे लोभस रुप अधिकच खुलून दिसले.


२६ जानेवारी प्रजासत्ताक दिनी श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरात तिरंगी फुलांची आकर्षक आरास करण्यात आली.

३. २६ जानेवारी प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात तिरंगी फुलांची आकर्षक आरास करण्यात आली.

२६ जानेवारी २०२० रोजी विठ्ठल रखुमाईचे साजिरे रूप.

४. २६ जानेवारी २०२० रोजी विठ्ठल-रखुमाईचे साजिरे रुप.

महाशिवरात्री निमित्त महादेवाला प्रिय असलेल्या बेलाच्या पानांची आरास करण्यात आली. श्री विठ्ठल आणि रुक्मिणी मातेचे गर्भगृह, प्रवेशद्वार आदी ठिकाणी ही आरास केली गेली.

५. महाशिवरात्री निमित्त महादेवाला प्रिय असणाऱ्या बेलाच्या पानांनी श्री विठ्ठल आणि रुक्मिणी मातेचे गर्भगृह, प्रवेशद्वार आदी ठिकाणी ही आरास करण्यात आली.

माघी एकादशीनिमित्त विठ्ठल मंदिर आणि रुक्मिणीमाता मंदिराला आकर्षक फुलांची आरास करण्यात आली होती.

६. माघी एकादशी निमित्त विठ्ठल मंदिर आणि रुक्मिणीमाता मंदिराला आकर्षक फुलांची आरसा करण्यात आली होती.

चैत्र एकादशीला श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीने श्री विठ्ठल आणि रुक्मिणी मातेस १ लाख गुलाबाच्या फुलांची आरास केली.

७. चैत्र एकादशीला श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीकडून श्री विठ्ठल-रुक्मिणी मातेस १ लाख गुलाबाच्या फुलांची आरास करण्यात आली.

गुढीपाडव्याच्या निमित्ताने चाफा,मोगरा, गुलाब आणि तुळस अशा १५० किलो फुलांची आरास या मंदिरात करण्यात आली होती.

८. मराठी नवीन वर्ष गुढीपाडव्याच्या निमित्ताने चाफा, मोगरा, गुलाब आणि तुळस अशा १५० केले फुलांची आरसा या मंदिरात करण्यात आली होती.

सुंदर ते ध्यान उभे विटेवर...

९. सुदंर ते ध्यान उभे विटेवर….

वैशाख संकष्टी चतुर्थी निमित्ताने पंढरपूरच्या श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरात आंब्याची नेत्रदीपक आरास करण्यात आली होती.

१०. श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात वैशाख संकष्टी चतुर्थी निमित्ताने आंब्याची नेत्रदीपक आरास करण्यात आली होती.

लॉकडाउनच्या काळात विठ्ठल मंदिर भाविकांसाठी मंदिर बंद होते, तरीही आंब्याच्या मोसमात विठ्ठल रखुमाईच्या मूर्तीभोवती आंब्यांची सजावट करण्यात आली होती.

११. कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवरती लॉकडाऊन काळात विठ्ठल मंदिर भाविकांसाठी बंद करण्यात आले होते, तरीसुद्धा आंब्याच्या मोसमात मंदिर समितीच्या वतीने विठ्ठल-रखुमाईच्या मूर्तीभोवती आंब्याची सजावट करण्यात आली होती.

दशहराच्या निमित्ताने श्री विठ्ठल रुक्मिणीच्या गाभाऱ्यात द्राक्ष आणि द्राश्र वेलींच्या सहाय्याने मनमोहक सजावट करण्यात आली होती.

१२. श्री विठ्ठल-रुक्मिणीच्या गाभाऱ्यात दशहराच्या निमित्ताने द्राक्ष आणि द्राक्ष वेलींच्या साहाय्याने मनमोहक सजावट करण्यात आली होती.

विठ्ठल रखुमाईला चंदनाच्या उटीचा साज

१३. उन्हाचा दाह जाणवू नये म्हणून विठ्ठल रखुमाईच्या मूर्तीला उटीचा साज.

या विठूचा गजर हरीनामाचा...

१४. या विठूचा गजर हरीनामाचा….

करोना काळात साजरी होणारी ही पहिलीच आषाढी एकादशी.. या एकादशीला पंढरपूर भक्तांच्या गर्दीने फुलून जाणार नाही.. यंदाच्या आषाढी एकादशीला पंढरपुरात होणाऱ्या शासकीय महापुजेसाठी मुख्यमंत्र्यांसोबत पुजेचा मान असणाऱ्या मानाच्या वारकऱ्याची निवड करण्यात आली आहे. विठ्ठल मंदिरात गेली सहा वर्षे सेवा करणारे विणेकरी विठ्ठल ज्ञानदेव बडे यांची यासाठी निवड करण्यात आली आहे.

१५. कोरोना संसर्गाच्या प्रसार रोखण्यासाठी तसेच भाविकांच्या आरोग्याच्या दृष्टीने यंदाची वारी रद्द करण्यात आली. प्रतिवर्षी आषाढी एकादशी सोहळ्यासाठी पंढरीत १० ते १२ लाख भाविक दाखल होतात.

मात्र, इतिहासामध्ये पहिल्यादांच आषाढ महिन्यात पंढरपूरमध्ये संचार बंदी लागू झाली असून, निर्मनुष्य पंढरपूच्या रस्त्याचे हे चित्र प्रथमच पाहावयास मिळणार आहे. तसेच यंदाच्या शासकीय महापूजेसाठी मुख्यमंत्र्यांसोबत पूजेचा मान असणाऱ्या वारकऱ्याची निवड करण्यात आली आहे. विठ्ठल मंदिरात गेली सहा वर्षे सेवा करणारे विणेकरी विठ्ठल ज्ञानदेव बडे यांची यासाठी निवड करण्यात आली आहे. (फोटो सौजन्य – श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समिती, पंढरपूर)