दीपिका पादुकोणच्या ‘मादक’ फोटोंमुळं पुन्हा सोशलवर ‘राडा’ !

पोलीसनामा ऑनलाईन :बॉलिवूड  स्टार दीपिका पादुकोण काही दिवसांपूर्वीच आपल्या फोटोशुटमुळं चर्चेत आली होती. तिनं इंटरनॅशनल एल(Elle) मॅगेझिनसाठी फोटोशुट केलं होतं. दीपिकानं यातील काही बोल्ड आणि हॉट फोटो सोशलवर शेअर केले होते. ज्यांनी सोशल मीडियावर अक्षरश: राडा घातला होता. पती रणवीर सिंगदेखील तिचे फोटो पाहून अवाक् झाला होता. त्यानं कमेंट करत म्हटलं होतं की बस करत आता. प्रेक्षकांची दया येऊ दे थोडी.

दीपिका पादुकोणला फॅशन आणि स्टाईल आयकॉन म्हणूनही ओळखलं जातं. अनेकजण तिची स्टाईल फॉलो करायला पाहतात. दीपिकानं आजवर अनेक ब्रँड आणि मासिकांसाठी फोटोशुट केलं आहे. अनेकदा आपल्या फोटोंमुळं तिनं सोशलवर धुमाकूळ घातला आहे. कधी ग्लॅमरस आणि सटनिंग तर कधी बोल्ड आणि हॉट अवतारानं तिनं चाहत्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे.

दीपिकाची सोशल मीडियावर फॅन फॉलोविंगदेखील मोठी आहे. हेच कारण आहे की, दीपिकानं एखादा फोटो किंवा व्हिडीओ टाकायचा उशीर असतो की, क्षणात तो व्हायरल होताना दिसतो. तिच्या सोशल पोस्टरला चाहत्यांचा नेहमीच मोठा प्रतिसाद मिळताना दिसत असतो.

दीपिकाच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर काही दिवसांपूर्वीच तिचा छपाक सिनेमा रिलीज झाला आहे. लवकरच ती पती रणवीर सिंगसोबत 83 या सिनेमात दिसणार आहे. कपिल देव यांची पत्नी रोमी भाटीया यांचा रोल ती साकारत आहे. रणवीर सिंगनं कपिल देवची भूमिका साकारली आहे. याशिवाय ती शकुन बत्राच्या अनाम या सिनेमातही दिसणार आहे. या सिनेमात अनन्या पांडे, सिद्धांत चतुर्वेदी हेदेखील असणार आहेत.

https://www.instagram.com/p/B8d3-KtH22y/

https://www.instagram.com/p/B-BmGZKhYeJ/