भारताला वर्ल्ड कप जिंकून देणाऱ्या ‘या’ फलंदाजावर ‘बंदी’, ‘KKR’ च्या 2 खेळाडूंवर देखील ‘कारवाई’चे सावट

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – मागील वर्षी अंडर – 19 वर्ल्ड कप जिंकून देणारा भारताचा फलंदाज मनजोत कालरावर दोन वर्षांसाठी बंदी घालण्यात आली आहे. याला कारण आहे की मनजोतला वयाच्या घोटाळाच्या आरोपाखाली दोषी ठरवण्यात आले आहे. एका वृत्तानुसार दिल्ली क्रिकेट लोकपालनं त्याच्यावर ही बंदी आणली आहे. याशिवाय तरुण खेळाडू शिवम मावीवर देखील कारवाई होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. वयाच्या फसवणूक संबंधित त्याचे प्रकरण बीसीसीआयकडे सोपावण्यात आले आहे.

गेल्यावर्षी झालेल्या अंडर – 19 वर्ल्ड कप स्पर्धेत मनजोत कालरा मॅन ऑफ द मॅच ठरला होता. अंतिम सामन्यात त्याने शतकी खेळी केली होती. त्यानंतर जूनमध्ये दिल्ली पोलिसांच्या विशेष तपास पथकाने कालराच्या पालकांविरोधात आरोपपत्र दाखल केले.

मनजोत कालरावर असा आरोप आहे की ज्युनिअर क्रिकेट खेळण्यासाठी त्याने आपली 1999 अशी जन्मतारीख सांगितले होती. कालराची वास्तवात जन्मतारीख 15 जानेवारी 1998 आहे असे एका वृत्तानुसार कळते आहे. परंतु हे प्रकरण जेव्हा समोर आले तेव्हा मनजोत कालरा अल्पवयीन असल्याचे कळाल्याने एफआयआर दाखल करण्यात आली नाही. परंतु आता त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे आणि त्यांच्यावर बंदी घालण्यात आली आहे.

दोन्ही खेळाडू संकटात –
अंडर-19 संघात सहभागी असलेल्या शिवम मावीवर बंदीची टांगती तलवार आहे. टीम इंडियाचे भविष्य म्हणून मावीकडे पाहिले जाते. असे असले तरी वयात फसवणूकीत केल्याचा ठपका त्यांच्यावर असल्याने त्याला मोठा धक्का बसू शकतो. शिवम मावी 21 वर्षीय असून 6 प्रथम श्रेणी सामने खेळला आहे. त्यात त्याने 115 धावा जमावल्या असून 2 विकेट घेतल्या आहेत. तर त्याने लिस्ट ए क्रिकेटमध्ये 16 सामन्यात 74 धावा करत 22 विकेट घेतल्या आहेत. टी – 20 च्या 9 सामान्यात 13 धावा करुन पाच विकेट त्यांच्या नावे आहेत. वयाच्या घोटाळ्याप्रकरमी केकेआरचे इतर खेळाडू म्हणजेच नितीश राणा देखील आढळले आहेत. या खेळाडूना त्याच्या जन्मतारखेसंबंधित पुरावे सादर करण्यास सांगितले आहे. जर ही सत्य निघाले तर नितीश राणावर कारवाई होऊ शकते.

फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/