CM केजरीवालांच्या विजयासह अवतरला 1 वर्षाचा ‘मफरलमॅन’ (फोटो)

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – दिल्लीच्या विधानसभा निवडणुकीचे निकाल येऊ लागले असून आम आदमीचे सरकार स्थापन होत आहे. आपचे सरकार बनणार असल्याने सोशल मीडियावर प्रतिक्रियांचा महापूर आला आहे. सध्या ट्विटरवर एक फोटो जबरदस्त ट्रेंड करत आहे, यामध्ये डोळ्यावर चष्मा लावलेला आणि मफलर गुंडाळलेला एक चिमुकला केजरीवाल दिसत आहे.

little Arvind

या चिमुकल्या केजरीवालचे नाव अव्यान तोमर आहे. दिल्लीच्या मयूर विहारमध्ये राहणारे राहुल तोमर यांच्या या मुलाचे वय एक वर्ष आहे.

अव्यान आपले वडील आणि आई मिनाक्षी तोमर यांच्यासह सकाळी-सकाळी अरविंद केजरीवाल यांच्या घरी पोहचला. यानंतर सर्व कुटुंबासह छोटा केजरीवाल अव्यान आम आदमीच्या कार्यालयात पोहचला. अव्यानसोबत त्याची 9 वर्षांची बहिण सुद्धा आम आदमीच्या कार्यालयात आली होती.

aap

2015 मध्ये अव्यानची बहिण फेयरी तोमरसुद्धा छोटी अरविंद केजरीवाल झाली होती. त्यावेळी अरविंद केजरीवाल आणि पार्टीतील तत्कालीन नेते कुमार विश्वास यांनी अव्यानच्या बहिणीसोबत फोटोही काढले होते. राहुल तोमर हे व्यापारी असून अण्णा आंदोलनाच्या वेळी ते अरविंद केजरीवाल यांचे मोठे फॅन होते.

दरम्यान, दिल्ली विधानसभा निवडणुकीचे निकाल येण्यास सुरूवात झाली आहे. मतमोजणी सकाळी 8 वाजल्यापासून सुरू झाली आहे. 8 फेब्रुवारीला दिल्ली विधानसभा निवडणुकीसाठी मतदान झाले होते. निवडणुकीत आम आदमी आणि भाजपामध्ये जोरदार संघर्ष दिसून आला होता.

दिल्लीत 81,05,236 पुरुष मतदार, 66,80,277 महिला मतदार आणि 869 तिसरे लिंग मतदार असून त्यांच्यासाठी एकुण 13,570 मतदान बूथ बनविण्यात आले होते.