आम आदमी पार्टीच्या विजयात ‘या’ 5 दिग्गजांनी निभावली मोठी ‘जबाबदारी’, म्हणूनच झाली विजयाची ‘हॅट्रिक’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – दिल्ली विधानसभा निवडणूक २०२० ची मतमोजणी चालू आहे. यात आम आदमी पक्षाने मोठी बाजी मारत ७० पैकी ६३ जागांवर बढत बनवली आहे. तर भाजपा फक्त ७ जागांवर कायम आहे. तर काँग्रेसने सकाळपासून खाते देखील उघडले नाही. यावरून स्पष्ट झाले आहे की, दिल्लीत पुन्हा एकदा आम आदमी पक्षच सत्ता स्थापन करणार आहे. पुन्हा एकदा केजरीवाल हेच मुख्यमंत्री पदाची शपथ घेतील. केजरीवालांना विजयी करण्यासाठी आपमधील उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया आणि दिल्लीचे प्रभारी संजय सिंह यांच्यासह ५ लोकांनी महत्वाची भूमिका पार पाडली आहे. या पाच लोकांमुळे केजरीवाल आपल्या विजयाची हॅट्रिक बनवण्यास सफल झाले आहेत.

प्रशांत किशोर यांनी सांभाळली निवडणूक संचलनाची जबाबदारी
निवडणुकीचे रणनीतिकार प्रशांत किशोर यांची कंपनी I-PAC ने दिल्ली विधानसभा निवडणुकीत आम आदमी पक्षासाठी निवडणुक संचालनाची जबाबदारी सांभाळली. मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या बदललेल्या भाषणापासून ते त्यांच्या विकासकामांच्या प्रचारापर्यंत प्रशांत किशोर यांनी एक रणनीती आखली होती. त्यांच्या रणनीतीचा एक भाग म्हणून केजरीवाल यांनी इतर पक्षांवर, विशेषत: भाजपा किंवा पंतप्रधान नरेंद्र मोदींना लक्ष करण्याऐवजी लोकांना मागील पाच वर्षात आपल्या निर्णयाने कसा फायदा झाला हे सांगितले. आम आदमी पार्टीने निवडणुकीच्या निकालात विजय मिळवल्यानंतर ट्विट करून प्रशांत किशोर यांनीही दिल्लीतील जनतेचे आभार मानले आहेत. प्रशांत किशोर यांनी ट्वीट केले की, ‘भारताच्या आत्म्याची रक्षा करण्यासाठी उभे राहिल्याबद्दल दिल्लीकरांना धन्यवाद!’

आपचे दिल्ली प्रभारी संजय सिंह यांनी निभावली भाजपावर पलटवार करण्याची जबाबदारी
केजरीवाल यांच्या विजयाच्या हॅटट्रिकमध्ये राज्यसभा सदस्य आणि पक्षाचे नेते संजय सिंग यांचे मोठे योगदान आहे. ते दिल्लीचे प्रभारी होते, अर्थात निवडणुकीची जबाबदारी त्यांच्या खांद्यावर होती. जेव्हा जेव्हा भाजपने अरविंद केजरीवाल यांच्यावर हल्ला केला तेव्हा संजय सिंग केवळ ढाल म्हणून उभे राहिले नाहीत तर त्यांनी जोरदार हल्ला देखील केला. ते पक्षाचे स्टार प्रचारक होते. त्यांनी मोठ्या प्रमाणात भाजपवर वेळोवेळी हल्ला केला. आप सरकार पुन्हा एकदा सरकार स्थापन करणार असे चित्र दिसताच जनतेशी बोलताना संजय सिंह म्हणाले की, केजरीवाल यांनी सर्वसामान्यांच्या मूलभूत गरजा पूर्ण करण्यासाठी पाच वर्षे तन मन समर्पित करून काम केले. काही लोक भारत-पाकिस्तान सामन्याबद्दल बोलले होते. आता भारताचा विजय झाला आहे. असे ही त्यांनी स्पष्ट केले.

उपमुख्यमंत्र्यांच्या रणनीतीने मिळवून दिला मोठा विजय
केजरीवाल सरकारमध्ये उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया तिसऱ्यांदा निवडणूक मैदानात होते. त्यांनी तिसऱ्यांदा पटपडगंजची जागा जिंकली आहे. स्टार प्रचारकाच्या भूमिकेत दिसणारे सिसोदिया निवडणूक रणनीती बनवण्यात माहिर आहेत. असे म्हटले जात आहे की त्यांच्या वेगळ्या धोरणामुळे आम आदमी पार्टीने विजयाची हॅट्रिक केली आहे. कधी आणि कुठे रॅली घ्यायची हा निर्णय तेच घेत होते. तसेच केव्हा कोणत्या क्षेत्रात लोकांशी थेट संवाद करावा हे देखील तेच ठरवत होते. जेव्हा भाजपने आक्रमक मोहीम सुरू केली तेव्हा सर्वसामान्यांमध्ये जाऊन पक्षाचा पाया मजबूत करण्याचे काम देखील त्यांनीच केले. आता कॉंग्रेसनंतर आम आदमी पार्टी असा पक्ष बनला आहे जो की पटपडगंजमध्ये सलग तिसऱ्यांदा विजयी झाला आहे.

पंकज गुप्ता यांनी वित्त व्यवस्थापनाची जबाबदारी सांभाळली
आप च्या विजयाच्या हॅट्रिकमध्ये पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस पंकज गुप्ता यांचेही मोठे योगदान आहे. ते पक्षाचे वित्त व्यवस्थापन सांभाळत होते. पंकज गुप्ता हे ठरवत होते की, कोठे किती पैसे खर्च करायचे. पंकज गुप्ता यांनी पक्षाच्या सभा आणि जाहीर सभांमध्ये होणाऱ्या खर्चापासून कार्यकर्त्यांवरील खर्चाचा आढावा घेण्याची मोठी जबाबदारी त्यांनी पार पडली. याशिवाय दिल्ली विधानसभा निवडणुक २०२० च्या प्रचारात ३७०० लोक बाहेरून आले होते. यांमधील एक म्हणजे पृथ्वी रेड्डी यांनी बेंगळुरू कडून निवडणूक लढविली होती. ते कर्नाटकचे पार्टी संयोजक आहेत.

प्रशासकीय परवानगी मिळवण्याची जबाबदारी नीरज कुमार यांच्याकडे होती.
निवडणूक प्रचारादरम्यान रोड शो, जाहीर सभा, नुक्कड सभा यापासून रॅली पर्यंतची प्रशासकीय परवानगी घेण्याची जबाबदारी नीरज कुमार यांच्यावर होती. पक्षाच्या कार्यक्रमांना येणार्‍या प्रत्येक कायदेशीर अडथळ्याचा त्यांनी सामना केला आणि त्यास परवानगी मिळवून दिली. आम आदमी पार्टी आणि दिल्ली पोलिस यांच्या वतीने निवडणूक आयोगाशी बोलणारे मुख्य व्यक्ती नीरज कुमार हेच होते. नीरज कुमार हे बर्‍याच काळापासून आम आदमी पार्टीशी संबंधित आहेत. भ्रष्टाचाराविरूद्धच्या चळवळीशीही त्यांचा संबंध होता.