विमानतळावर मिळालेल्या बेवारस मधील ‘RDX’ निघाला समुद्रातील शंख, पोलिस झाले ‘हैराण-परेशान’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – राजधानी दिल्लीमधील इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर काल एका संदिग्ध बॅगेत आरडीएक्स आढळून आल्याने खळबळ उडाली होती. त्यानंतर आता त्या बॅगेचा मालक सापडला असून तो हरियाणामध्ये राहणारा आहे.

चुकीने राहिली होती बॅग –

बॅग सापडल्यानंतर त्याने पोलीस स्टेशनमध्ये येत पोलिसांना सांगितले कि, तो आपल्या मित्रांसह स्पाइसजेटच्या फ्लाईटने मुंबईवरुन दिल्लीला आला होता. त्यावेळी चुकीने ती बॅग विमानतळावर विसरली. ज्यामध्ये चॉकलेट, लॅपटॉप चार्जर, कपडे, मिठाई आणि काजू होते. त्यानंतर पोलिसांनी तपास केला आणि त्याला क्लीनचिट दिली.

व्हेरिफिकेशन नंतर पोलिसांनी दिली क्लीन चिट –

बॅगेच्या मालकाचे नाव शाहिद असून तो हरियाणाचा रहिवासी आहे. त्याच्याकडील सामानाची चौकशी केल्यानंतर आणि तपासल्यानंतर त्याला क्लीन चिट दिली. तसेच या बॅगेत असणाऱ्या लॅपटॉपच्या चार्जरला तार म्हणण्यात येत होते तर शंख असल्याने त्यांना आरडीएक्स समजण्यात आले होते.

काय होते प्रकरण –

दिल्ली पोलिसांना एका संदिग्ध बॅगमध्ये RDX असल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत बॅग जप्त केली होती. त्यानंतर केलेल्या तपासात त्यांना मोठ्या प्रमाणात स्फोटके आढळून आल्याने सुरक्षा यंत्रणांवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात होते. तसेच विमानतळावरील सुरक्षा यंत्रणांवर देखील प्रश्न उपस्थित केले जात होते.

Visit : Policenama.com