सावधान ! जर महामार्गावर कोणी तुमच्या नावाने हाक मारली तर सतर्क रहा,होवु शकतं मोठं नुकसान

नवी दिल्ली : वृत्तसंस्था –  महामार्गावर दररोज अनेक लुटमारीच्या घटना घडत असल्याचे आपण ऐकले असेल. पण महामार्ग व एक्सप्रेस वेवरील प्रवाशांना या दिवसांत लुटल्याचे वेगळेच प्रकरण समोर आले आहे. यामुळे पोलिसांनी एडवायजरी जारी केली आहे. पोलिसांनी सांगितले की, महामार्ग आणि एक्सप्रेस वेवर काही टोळ्या सक्रिय झाल्या आहेत. या टोळ्या कारच्या नंबरच्या आधारे वाहन मालकाचे नवा शोधून बाईकवरून पाठलाग करतात. कार चालकाला तुम्हाला ओळखत असल्याची बतावणी करुन लुटतात. त्यामुळे अशा लोकांपासून सावध रहावे असे पोलिसांनी आवाहन केले आहे.

मोबाईल अ‍ॅपचा वापर

पोलिसांनी सांगितले की, हे लोक एम ट्रान्स्पोर्ट मोबाइल अ‍ॅपद्वारे वाहन मालकांची माहिती मिळवतात. त्यानंतर ते नावाने आवाज देतात. हे लोक असे भासवताता की ते तुमचा जुना मित्र किंवा ओळखीचा आहे. यानंतर वाहन मालकाला बोलण्यात गुंतवून गाडी रस्त्याच्या कडेला घेण्यास सांगतात. वाहन मालकाने गाडी रस्त्याच्या कडेला घेतल्यानंतर वाहन चालकाची लुटकरून पळून जातात.

अशा घटना अनेक शहरांमध्ये घडल्या

ही टोळी महामार्गावर दरोडे टाकत आहे. मात्र, दिल्लीच्या आसपासच्या शहरांमध्ये एक्सप्रेस वेवर अशा अनेक घटना घडल्या आहेत.हे लक्षात घेता उत्तर प्रदेश पोलिसांनी एक एडवायजरी जारी केली आहे. अशा घटनांपासून सावध राहण्याचे आवाहन पोलिसांनी वाहन चालकांना केले आहे.

एम ट्रान्स्पोर्ट मोबाइल अ‍ॅपवरून नाव शोधतात

ही टोळी पहिल्यांदा गाडी मालकाचे नाव आणि पत्ता घेतात. यासाठी ते एम ट्रान्स्पोर्ट मोबाइल अॅपचा वापर करतात. या अॅपमुळे कोणत्याही गाडीच्या नंबरवरून गाडी मालकाचे नाव आणि पत्ता सहजपणे मिळवता येतो.