जमिनींच्या सरकारी मूल्यांकनाबाबत शिष्ठमंडळाचे महसुलमंत्री बाळासाहेब थोरात यांना निवेदन

लासलगाव – राज्यातील जमीनिंचे सरकारी मूल्यांकन अर्थात रेड़ी रेकनर च्या दरांतील दुरुस्तीबाबत नाशिक जिल्हा काँग्रेस कमिटी सरचिटणीस सचिन आत्माराम होळकर यांच्या नेतृत्वात निफाड तालुका काँग्रेस कमिटी तर्फे महसुलमंत्री बाळासाहेब थोरात यांना नुकतेच निवेदन दिले

निवेदनानुसार काही वर्षांपासून राज्यातील जमिनींचे भाव मोठ्या प्रमाणात कमी झाले मात्र सरकारी मूल्यांकन अद्याप कमी झालेले नाही सध्या अनेक ठिकाणी असे दर हे खरेदीच्या दराच्या दुप्पट असल्याने व्यवहारात मोठ्या प्रमाणात मुद्रांक शुल्क भरावे लागत आहे बऱ्याच वेळा मुन्द्रांक शुल्क जास्त असल्याने अनेक व्यवहार होत नाही यामुळे एकप्रकारे सरकारी महसुल बूड़त आहे असे सरकारी दर हे विभागाप्रमाने 35 ते 50 टक्के कमी होण्याची गरज आहे यावर महसुलमंत्री थोरात यांनी यावर लवकरच तोडगा काढण्यात येईल असे आश्वासन सचिन होळकर यांना दिले तसेच लवकरच नविन जीआर काढण्यात येईल असे चर्चा दरम्यान सांगण्यात आले यापुढेही ह्या बाबीसाठी पाठपुरावा करणार असल्याचे सचिन होळकर यांनी पत्रकारांशी बोलतांना सांगितले सदर निवेदन देतेवेळी सचिन होळकर यांच्या समवेत किसान काँग्रेस चे स का पाटील, निफाड तालुकाध्यक्ष मधुकर शेलार, सुनील निकाळे सुहास सुरळीकर, साधना जाधव, आदि उपस्थित होते