सहायक पोलीस निरीक्षक लोणारे यांचे उपमुख्यमंत्री अजित पवारांकडून कौतुक

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – पोलिसांवर टीका करणाऱ्यांची संख्या भरपूर आहे. मात्र, खाकी वर्दीमध्ये सतत माणूस लपल्याचा प्रत्यय अनेकवेळा आला आहे. कोरोनाच्या कालावधीमध्ये हडपसर पोलीस स्टेशनमध्ये नोडल अधिकारी म्हणून प्रसाद लोणारे यांनी चांगली कामगिरी केली. त्याबद्दल पोलीस आयुक्त के. व्यंकटेशमन यांनीही ट्विट करून कौतुकही केले आहे. पोलीस आयुक्तालयामध्ये लावलेल्या चित्रांची पाहणी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी करून कौतुकाची थाप सहायक पोलीस निरीक्षक प्रसाद लोणारे यांच्या पाठीवर दिली आहे.

लोणारे मागिल 19 वर्षांपासून पोलीस दलामध्ये अधिकारी म्हणून काम कार्यरत आहेत. कोरोनाच्या कालावधीमध्ये त्यांनी हडपसर पोलीस स्टेशनमध्ये नोडल अधिकारी म्हणून जबाबदारी उत्तम सांभाळली, याची प्रचिती सामान्य नागरिकांपासून ते कर्नल अधिकाऱ्यांनाही आली आहे. हडपसर पोलीस स्टेशमध्ये सलग चार महिने कायदा सुरक्षा आणि नागरिकांना मदत कऱण्याचे विशेष काम केले आहे. लॉकडाऊनमध्ये सुरुवातीच्या काळामध्ये आपल्या कुटुंबीयांना त्रास नको म्हणून स्वतः दोन महिने स्वतंत्र खोली घेऊन राहत होते. हडपसरमधील गरजूंना गरजेप्रमाणे त्यांना औषधे व धान्य दिले. तसेच लॉकडाऊनमध्ये विनाकारण फिरणाऱ्यावर कडक कारवाई ही केली.

मांजरी येथे 25 एप्रिल 2020 रोजी निवृत्त कर्नल कॅन्सरने आजारी असल्याचे समजले. त्यांना औषधाची गरज होती. त्यांनी हडपसर पोलीस स्टेशनला कळविल्यानंतर प्रिस्क्रीप्शन आणि अंडरटेकिंग घेऊन स्वारगेट येथून तीन लाखाचे औषधे मिळवून दिली.

लॉकडाऊनच्या कालावधीत पोलिसांनी पालकत्व स्वीकारून मिल्ट्रीमधील कर्नलच्या मुलाचे आणि मिल्ट्रीमधील डॉक्टरांच्या मुलीचे लग्न लावून देण्याची देशातील पहिले काम करण्याचे भाग्य यांना लाभले. डेहराडून येथील कर्नल यांच्या मुलाचे लग्न 2 मे रोजी होते. लॉकाडऊनमुळे ते येऊ शकत नसल्याने नियंत्रण कक्षाकडून माझ्याशी संपर्क साधून लग्नासाठी मदत करता येईल का, असे सांगितले. तर मुलीचे वडिल मिल्ट्रीमध्ये डॉक्टर होते, त्यांना नागपूरला ड्युटी होती. त्यामुळे तेही येऊ शकत नव्हते. पोलीस आयुक्त के. व्यंकटेशमन आणि पोलीस उपायुक्त सुहास बावचे यांना लग्नाविषयी माहिती दिली असता त्यांची परवानगी मिळाल्यानंतर 2 मे रोजी लग्न लावून दिले. वधू-वरांना पोषाख आणि स्वतः कन्यादान करून दिले. हे देशातील पाहिले लग्न आहे की ज्याचे पालकत्व पोलिसांनी स्वीकारून कन्यादान करून अश्या परिस्थितीत लग्न लाऊन दिले. या लग्नाला मुला मुली कडचे कोणीही हजर नव्हते. फक्त पोलिसांनी ही जबाबदारी स्वीकारून लग्न लावून दिले.

हडपसर परिसरातील परराज्यातील एक कंपनी मधील कामगारांना कंपनी कंपनीच्या बाहेर जाऊ देत नव्हते. कामगाराचा संयम सुटून बाहेर जाण्यासाठी कायदा हातात घेण्या आगोदर तेथे जाऊन त्यांना समजावून सांगितले व त्यांचे मन परिवर्तन करून एक मोठा कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्या आगोदर परिस्थिती संयमाने हाताळली आणि त्यांना त्याच्या राज्यात परत जाण्यासाठी मदत केली.

हडपसरमधील एका गरीब महिलेच्या पतीचा खुबा मोडला होता, तर दोन मुलांसह महिला 8महिन्याची गरोदर होती. आणि अन्न धण्यासाठी वणवण फिरत होती त्या महिलेची परिस्थिती बघून तिला गाडीने घरी पाठाऊन तिला एक महिन्याचे अन्नधान्य दिले. हडपसरमध्ये एक अपंग मुलगा चौकाचौकात स्टेशनरीसारख्या वस्तू विकून उदरनिर्वाह करीत होता. त्याला दीड महिनाभर पुरेल एवढे धान्य दिले. त्याचे आई-वडिल वयस्कर आहेत. लॉकडाऊनमध्ये धंदाच होत नव्हता, त्यामुळे त्याच्यावर उपासमारीची वेळ आली होती.

पोतदाराजाला कोणी काहीच देत नव्हते. दिवसभर फिरूनही त्याला कोणी जवळ येऊ देत नव्हते त्याला पोलिस स्टेशन ला मदत मिळेल तो पोलिस स्टेशन ला आला आणि तो भेटल्यानंतर त्याला एक महिन्याचे धान्य आणि 500 रुपये रोख दिले. तसेच हडपसर भागात गोरगरीब आणि गरजू लोकांना सुमारे 800 किराणा पुरविले आणि रोज 500 लोकांच्या जेवणाची व्यवस्था पहिली. पोलीस ड्युटीशिवाय मोठी कामगिरी केली, त्याची दखल घेत तसेच राष्ट्रीय चर्मकार संघ व ज्ञानदीप बहुद्देशीय सामाजिक विकास संस्थेने त्यांच्या कामाची दखल घेऊन सन्मानपत्र देऊन गौरव केला आहे.