30 इंच पाऊस होऊनही लासलगावकर तहानलेलेच

लासलगाव – लासलगाव शहराला पाणीपुरवठा करणारी सोळा गाव पाणीयोजना पुन्हा नादुरुस्त झाल्याने गेल्या आठ दिवसांपासून लासलगाव करांना पाणी टंचाईला सामोरे जावे लागत आहे लासलगाव शहर व परिसरामध्ये आत्तापर्यंत तीस इंच पाऊस होऊन देखील लासलगाव करांना पावसाळ्यामध्ये पाणीटंचाईला तोंड द्यावे लागत आहे

पाईपलाईन फुटणे ,मोटारी जळणे एक्सप्रेस फिडर असून देखील वारंवार विद्युत पुरवठा खंडित होणे या तिहेरी कारणांमुळे लासलगाव मधील नागरिक हतबल झाले आहे.महिन्याला फक्त तीन ते चार वेळेस पाणीपुरवठा होत आहे. हातावर पोट भरणारे तसेच नोकरदार वर्ग यांना ग्रामपंचायत कडुन होणाऱ्या पाणीपुरवठ्याची अचूक वेळ नसल्याने पाण्याची वाट पहात दिवसभर ताटकळत रहावे लागत आहे. प्रशासकाच्या ढिसाळ कारभारामुळे 25 हजाराहून जास्त लोकसंख्या असलेल्या लासलगाव करांना पावसाळ्यामध्ये भीषण पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे. या कृत्रिम पाणीटंचाईमुळे हंडाभर पाण्यासाठी महिलांना वणवण फिरावे लागत आहे.

आशिया खंडातील प्रथम क्रमांकाची कांद्याची बाजारपेठ, भाभा अनु संशोधन केंद्र,एनएचआरडीएफ,नाफेड यासारख्या अनेक महत्वाच्या संस्थेमध्ये लासलगावसह जवळपासच्या गावातील नागरिकांची मोठी वर्दळ असल्याने कृत्रिम रित्या असलेल्या पाणीटंचाईमुळे अनेक व्यावसायिक दुकानदारांना पाणी विकत घेण्याची वेळ आलेली आहे.

प्रतिक्रिया – महेंद्र हांडगे,रहिवाशी लासलगाव

लासलगाव पाणी टंचाई नित्याचीच झाली आहे. सत्ताधारी आणि विरोधक हे दोघेही पाणी टंचाई बाबत काहीच बोलत नाही. सोळा गाव पाणीपुरवठा दुरुस्तीचे ठेका एखाद्या एजन्सीला दिले गेले पाहिजे यामुळे नियमित त्याची देखभाल होईल आणि या समस्येपासून सुटका होईल.

प्रतिक्रिया – योगेश पाटील,ग्रामपंचायत सदस्य

समस्त गावकऱ्यांना वेळेवर पाणी पुरवठा होणे गरजेचे आहे मात्र 16 गाव पाणीपुरवठा करणारी पाईपलाईन जीर्ण झाल्यामुळे अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे यासाठी नुकतेच खासदार भारती पवार यांच्याशी चर्चा झाली आहे.

प्रतिक्रिया – सुधाकर सोनवणे प्रशासक,लासलगाव ग्रामपंचायत

पाणी पुरवठा विस्कळीत साठी प्रशासक यांना अनेकदा फोन केला असता त्यांनी फोन न उचलल्याने या संदर्भात गटविकास अधिकारी यांच्याशी संपर्क करून लासलगाव पाणी टंचाई बाबत माहिती दिली त्यांनी प्रशासक सोनवणे यांचेशी संपर्क करून या संदर्भात तुम्हाला प्रशासकाकडून माहिती देण्यात येईल मात्र अद्यापही प्रशासक यांनी याबाबत कुठलीही माहिती दिली नसल्याने एन पावसाळ्यात लासलगाव पाणी टंचाई सामोरे असतांना प्रशासकाला काहीच गांभीर्य दिसत नसल्याचे लक्षात येते

प्रतिक्रिया -सुरवसे साहेब (ऊपकार्यकारी अभीयंता, विजवितरण विभाग, निफाड

सोळा गाव पाणी पुरवठा योजनेच्या पाणी पुरवठ्याचे खापर विजवितरण विभागावर फोडले जाते, पण वस्तू स्थीती तशी नाही. रानवड,नैताळे, नांदुरमध्यमेश्वर येथे तांत्रिक बिघाड झाला तर विजपुरवठा खंडीत होतो, या मुळे कमकुवत झालेली पाईपलाईन फुटते. प्रश्न विजपुरवठ्याचा नसुन पाईपलाईन चा आहे.