धक्कादायक ! डॉक्टरांनी तरूणीनं केलं मृत घोषित, अंत्यसंस्कार करण्यापुर्वीच तिनं उघडले डोळे अन्…

पोलीसनामा ऑनलाईन टीम – अमेरिकेच्या मिशिगन राज्यातील डेट्रॉईट शहरात डॉक्टरांनी एका तरुणीला मृत घोषित केले होते. त्यानंतर तिच्यावर अंत्यसंस्कार केले जात असतानाच तरुणी उठून बसली. हा धक्कादायक प्रकार घडल्यानंतर तरुणीच्या कुटुंबियांना जबर धक्का बसला.

डेट्रॉईट येथील एका कुटुंबाने 20 वर्षीय मुलगी प्रतिसाद देत नसल्याचे कळल्यानंतर डॉक्टरांना बोलवले. डॉक्टरांनी तिच्यावर उपचार केले, मात्र तरुणीची परिस्थिती गंभीर होती.त्यानंतर तिला आपत्कालीन कक्षात हलवण्यात आले. आपत्कालीन कक्षातील डॉक्टरांनी वैद्यकीय माहितीच्या आधारे रुग्णाला मृत घोषित केले. ओकलँड काऊन्टीच्या वैद्यकीय परीक्षकांच्या कार्यालयाने सांगितले की, की या तरुणीचा मृतदेह कदाचित शवविच्छेदन न करता कुटुंबाला देण्यात आला. डॉक्टरांनी मृतदेह दिल्यानंतर या तरुणीच्या अंत्यसंस्कारासाठी मृतदेह डेट्रॉईटमधील जेम्स एच कोल येथे नेले. मात्र अंत्यसंस्काराआधी एक विचित्र प्रकार घडला. स्मशानभूमीतील कर्मचार्‍यांना तरुणी जिवंत असल्याचे कळले. अंत्यसंस्कार करण्याआधीच या तरुणीने डोळे उघडले असता खळबळ उडाली होती.