Unlock च्या गोंधळावरून फडणवीसांची सरकारवर टीका, म्हणाले – ‘ही अपरिपक्वता की श्रेयवाद?’

मुंबई : राज्याचे मदत व पुनर्वसनमंत्री विजय वडेट्टीवार यांनी राज्यातील जिल्ह्यांची पाच टप्प्यात विभागणी करून तेथील निर्बंध (Restrictions) शिथिल करण्यात येणार असल्याची घोषणा केली होती. एवढेच नाही तर त्यांनी कशा पद्धतीने हे निर्बंध (Restrictions) शिथिल करण्यात येणार आहे.

पहिल्या टप्प्यात कोणत्या जिल्ह्याचा समावेश असणार आहे याचीही त्यांनी माहिती दिली होती. त्यानंतर काही तासातच राज्य राज्य सरकारकडून या घोषणेबाबत खुलासा करण्यात आला. तर मंत्री वडेट्टीवार यांनी लगेचच घुमजाव करीत पाच टप्प्यांनुसार निर्बंध शिथिल करण्याबाबत तत्त्वत: मान्यता देण्यात आली आहे.

अंतिम निर्णय मुख्यमंत्री घेतील असे सांगितले. त्यामुळे सर्वत्र गोंधळाचे वातावरण निर्माण झालेले होते. या गोंधळावरून भाजपने महाविकास आघाडीवर सडकून टीका केली आहे.

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी ट्विटरवरून राज्य सरकारच्या गोंधळावर ‘काय सुरू, काय बंद? कुठे आणि केव्हापर्यंत? लॉक की अनलॉक? पत्रपरिषद की प्रेसरिलीज? अपरिपक्वता की श्रेयवाद?’ असे प्रश्न करत खरमरीत टीका केली आहे.

तर दुसरीकडे मनसेनेही राज्यसरकारच्या कारभारावर ताशेरे ओढले आहेत.मनसे नेते संदीप देशपांडे यांनी वडेट्टीवार साहेब तुमच्या या निर्णयामुळं मुख्यमंत्र्यांना रोज मंत्रालयात जायला लागू शकतं. काही कळत की नाही तुम्हाला असा टोला लगावला आहे.

 

Also Read This : 

 

Pune : लष्कराची बनावट वेबसाईट तयार करून नोकरीचे आमिष ! बनावट नियुक्तीपत्राव्दारे लाखोंची फसवणूक केल्याच्या प्रकरणाच्या तपासासाठी विशेष तपास पथकाची नियुक्ती

 

LIC कन्यादान पॉलिसी : जमा करा केवळ 130 रुपये, मुलीच्या लग्नासाठी मिळतील पूर्ण 27 लाख, जाणून घ्या कसे?

 

शॉम्पू केल्याच्या दुसर्‍याच दिवशी केस तेलकट होतात? ‘हे’ घरगुती उपाय येतील तुमच्या कामाला, जाणून घ्या

 

आता घरबसल्या स्वतःच करा 250 रुपयात कोरोना चाचणी ! 15 मिनिटात अहवाल तुमच्या हातात ICMR कडून टेस्ट किटला परवानगी

 

सूर्यप्रकाशापासून बचाव करण्यासाठी घरच्या घरी बनवलेले सनस्क्रीन लोशन वापरा, जाणून घ्या

 

गरीब आणि वंचितांसाठी चालणार मोदी सरकारचे विशेष अभियान, बनवणार 2 कोटी रेशन कार्ड; जाणून घ्या

 

शरीरासाठी घाण्यातून काढलेलं कच्चं तेल खुपच उपयुक्त, जाणून घ्या कसं केलं जातं तयार

 

Pune : महापालिका प्रशासनाचा ‘साहित्य’ खरेदीला चाप ! जागा दाखवा आणि साहित्य खरेदीचा प्रस्ताव पाठवा; उधळपट्टीला चाप लावण्यासाठी सर्व खरेदी ‘वित्तीय समिती’च्या अधिपत्याखाली

 

उन्हाळ्यात व्यायाम करताना घ्या काळजी