देवेंद्र फडणवीस भडकले, म्हणाले – ‘गृहमंत्री कुठे आहेत ?,पूजा चव्हाण प्रकरणावर ते का बोलत नाहीत ?

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन –  राज्यात गाजत असलेल्या पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणावरुन विरोधी पक्षनेतेने देवेंद्र फडणवीस यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर टीकास्त्र सोडल आहे. छोट्या छोट्या गोष्टींवर बोलणारे गृहमंत्री कुठे आहेत. ते पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणावर का बोलत नाहीत. तपास नेमक्या दिशेने सुरु आहे, हे राज्यातील जनतेला गृहमंत्री नेमकं का सांगत नाहीत ?, त्या ऑडिओ क्लिपमधला आवाज नेमका कुणाचा आहे हे पोलिस का सांगत नाहीत किंवा पडताळून का पाहत नाही, अशी प्रश्नांची सरबत्ती फडणवीसांनी गृहमंत्री देशमुख यांच्यावर केली आहे.

पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात दररोज नवनवे फोटो आणि ऑडिओ क्लिप बाहेर येत असल्याने गुंता दिवसेंदिवस वाढत आहे. अशा परिस्थितीतही पोलीस हातावर हात ठेऊन गप्प आहेत. पोलिसांचा तपास नेमका कोणत्या दिशेने सुरु आहे हे राज्यातील जनतेला कळले पाहिजे, असे फडणवीस म्हणाले. तसेच कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सरकार अधिवेशनापासून म्हणजेच विरोधकांच्या आणि जनतेच्या प्रश्नापासून पळ काढत असल्याचा आरोप फडणवीस यांनी केला. राज्यात कायदा आणि सुव्यवस्थेचे, शेतकऱ्यांचे प्रश्न आहेत, जे अधिवेशनात मांडायचे आहेत. त्यासाठी आम्ही पूर्ण अधिवेशन घेण्याची मागणी केल्याचे फडणवीस यांनी सांगितले. पण ठाकरे सरकार कायद्यात न बसणार अधिवेशन घेत असल्याची टीका फडणीस यांनी केली आहे.