Devendra Fadnavis | ‘अलिकडे संजय राऊत एवढे बिनडोक आरोप…’ संजय राऊतांच्या ‘त्या’ पत्रावरुन देवेंद्र फडणवीसांचा घणाघात (व्हिडिओ)

पिंपरी-चिंचवड : पोलीसनामा ऑनलाइन – चिंचवडमध्ये लोकांचे लक्ष्मण जगताप (Laxman Jagtap) यांच्यावर प्रचंड प्रेम होतं. तसेच भाजपचं (BJP) देखील चिंचवड विधानसभा मतदारसंघात चांगले नेटवर्क आहे. त्यामुळे मला विश्वास आहे की भाजपच्या उमेदवार अश्विनी जगताप (Ashwini Jagtap) या चांगल्या मताने निवडून येतील असा विश्वास उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी व्यक्त केला. चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) मंगळवारी चिंचवडमध्ये आले होते. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी त्यांनी संजय राऊत (Sanjay Raut) यांच्या पत्राचा समाचार घेत राऊतांवर टीकास्त्र सोडलं.

 

संजय राऊतांच्या पत्रावर बोलताना देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) म्हणाले, खासदार संजय राऊत यांचं पत्र सनसनाटी निर्माण करण्यासाठी आहे का? असा माझा प्रश्न आहे. सुरक्षेचे विषय हे राजकारणाशी जोडण चुकीचं आहे. कुठल्याही पुराव्याशिवाय अशा प्रकारचा आरोप करणे हे त्यापेक्षाही चूक आहे. संजय राऊत असोत किंवा कोणी असो कुणालाही असुरक्षित वाटत असेल तर ती असुरक्षितता नक्की आहे का? त्यांना सुरक्षा पुरवणे (Providing Security) गरजेचे आहे का? यासंदर्भातील सगळी कारवाई ही आपल्याकडे गुप्तचर विभागाकडून (Intelligence Department) केली जाते. आम्ही त्यांचे पत्र कमिटीकडे पाठवत आहोत. या संदर्भात आपण कधीही महाराष्ट्रात राजकारण करत नसल्याचे सांगत आवश्यक असेल तर त्यांना सुरक्षा पुरवली जाईल असं फडणवीस यांनी सांगितले.

संजय राऊतांना प्रसिद्धीची सवय
संजय राऊत यांना विनाकरण प्रसिद्धीची सवय लागली आहे. विनाकारण कुठला तरी आरोप करायचा आणि प्रसिद्धी मध्ये राहायचं.
दोन हजार कोटी रुपयांचा आरोप केला. एक पुरावा त्यांच्याकडे नाही.
अलिकडे संजय राऊत एवढे बिनडोक आरोप करत आहेत की काय उत्तर द्यावं? रोज खोट बोलल्याने सहानुभूती मिळत नाही.
चुकीचे आरोप लावल्याबद्दल संजय राऊतांवर कारवाईची मागणी केली जाईल असं मला वाटतं असेही देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.

 

ते महाराष्ट्राला बदनाम करत आहेत
भीमाशंकर (Bhimashankar) संदर्भात देवेंद्र फडणवीस यांना विचारले असता ते म्हणाले, जे लोक बोलत आहेत ते महाराष्ट्राला बदनाम करत आहेत.
कुणाच्याही मनात याबद्दल वाद नाही. ज्या लोकांकडे कोणतेच विषय नाहीत ते असले विषय उभे करत असतात.
भीमाशंकर हे महाराष्ट्रात आहे आणि ते बारा ज्योतिर्लिंगापैकी एक आहे.
कुणी काय जाहिरात दिली म्हणून यात बदल होणार नाही.
उद्या मी जर म्हटलं की कामाख्या मंदिर गुवाहाटीला (Kamakhya Temple Guwahati) नाही तर महाराष्ट्रात आहे
तर असं म्हटल्याने ते मंदिर महाराष्ट्रात येणार आहे का? जे लोक बोलत आहेत त्यांच्याकडे बोलण्यासारखं काहीही नाही.
कुणाच्याही मनात भीमाशंकरचा वाद नसल्याचे देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.

 

 

Web Title :- Devendra Fadnavis | dcm and bjp leader devendra fadnavis first reaction on sanjay raut letter which mentioned threat to attack on him

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

Pune Kasba Peth Bypoll Election | रोड शोनंतर हेमंत रासनेंचा PMPML मधून प्रवास, मतदारांशी साधला संवाद

Nashik Crime News | लग्नाचे आमिष दाखवून बलात्कार करणाऱ्यास सात वर्ष सक्तमजुरी; नाशिक न्यायालयाचा निर्णय

MC Stan | रॅपर एमसी स्टॅन बॉलिवूड मध्ये येण्यासाठी सज्ज; साजिद-वाजिदकडून मिळाली ‘ही’ खास ऑफर

Pune Kasba Peth Bypoll Election | भाजप महायुतीचे उमेदवार हेमंत रासने यांचा निर्धारनामा आणि कार्य अहवालाचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते प्रकाशन