Devendra Fadnavis | ‘मतदारांनी सारं काही झुगारुन लोकशाही निवडली’, सिंधुदुर्ग जिल्हा बँक विजयावर फडणवीसांचे मोजकं, पण सूचक विधान

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत (Sindhudurg District Bank Election) भाजपच्या (BJP) पॅनलने विज्य मिळवल्यानंतर भाजपमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. भाजपच्या राज्य पातळीवरील मुख्य नेत्यांकडून नारायण राणे (Narayan Rane) यांचे या विजयासाठी अभिनंदन केले जात आहे. आता या निकालानंतर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी प्रतिक्रिया दिली आहे. नारायण राणे यांचे अभिनंदन करताना देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी राज्यातील महाविकास आघाडीला (Mahavikas Aghadi) टोला लगावला आहे.

देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी ट्विट करत या विजयावर प्रतिक्रिया दिली आहे. या ट्विटमध्ये ते म्हणाले, सिंधुदुर्ग जिल्हा बँक निवडणुकीत भाजपला दणदणीत विजय मिळाला आहे. सरकारी यंत्रणेचा गैरवापर, पोलीसी दडपशाही, सत्तेची अरेरावी, हे सारे काही झुगारुन मतदारांनी लोकशाही (Democracy) निवडली आहे. केंद्रीय मंत्री नारायण राणे, रवींद्र चव्हाण (Ravindra Chavan) तसेच सर्व भाजप नेते, कार्यकर्ते आणि विजयी उमेदवारांचे मन:पूर्वक अभिनंदन, असे फडणवीस यांनी म्हटले आहे.

 

File photo

 

ही मुंबईच्या निकालाची नांदी !

ही मुंबई, ठाणे व नवी मुंबईच्या महापालिका निकालाची नांदी आहे, असे भाजप आमदार आशिष शेलार (MLA Ashish Shelar) यांनी म्हटले आहे. देवांक सोडल्यान अन् देवचराक धरल्यान आणि विधान परिषदेत एक जागा गमवल्यानं… आज सिंधुदुर्गात आघाडीचा भोपळो फुटलो…, असं शेलार यांनी म्हटलं. तसेच मा. अमित शाह (Amit Shah) म्हणाले त्याप्रमाणे हिंमत असेल तर तिघेही एकत्र समोर लढाईला या आम्ही तयार आहोत, असं आव्हानही त्यांनी आघाडीला दिलं.

Web Title : Devendra Fadnavis | devendra fadnavis chandrakant patil reaction on sindhudurg district bank election results

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

 

Pune Crime | पुण्यात नागरिकांना त्रास देणार्‍या गुंडाला पकडण्यासाठी गेलेल्या पोलिसांवर जमावाचा हल्ला ! येरवडा पोलिसांचा स्वरक्षणार्थ हवेत गोळीबार

Government Scheme | ‘ही’ सरकारी योजना माजी सैनिकांच्या मुलींच्या लग्नासाठी देते 50,000 ची रक्कम; जाणून घ्या कसा मिळेल लाभ

Employees Pension Scheme | 300% पर्यंत वाढू शकते पेन्शन ! 7500 रुपयांवरून वाढून 25000 रुपये होईल पेन्शन, जाणून घ्या गणित

Multibagger Penny stock | 15 महिन्यात 1 लाखाचे झाले 68 लाख, टाटा ग्रुपची आहे कंपनी

Gram Ujala Scheme | 12 वॅट LED बल्ब अवघ्या 10 रुपयात! जाणून घ्या पूर्ण योजना आणि लाभ घेण्याची शेवटची तारीख