Devendra Fadnavis | ‘काय होतास तू, काय झालास तू’, उद्धव ठाकरेंच्या टीकेवर देवेंद्र फडणवीसांचा टोला (व्हिडिओ)

अकोला : पोलीसनामा ऑनलाइन – ठाकरे गटाचे (Thackeray group) प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी वरळीत बोलताना देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्यावर टीका केली होती. देवेंद्रजी, तुमची परिस्थिती फार हालाखीची आहे. तुम्ही जे बोलताय, ते ठीक आहे. पण सहनही होत नाही आणि सांगताही येत नाही, अशा शब्दात ठाकरेंनी फडणवीसांवर निशाणा साधला होता. यावर उत्तर देताना देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी प्रत्युत्तर दिले. उद्धव ठाकरे आज काय काय बरळले, मला कधी कधी त्यांना म्हणावसं वाटतं, कोण होतास तू, काय झालास तू, अशा शब्दात फडणवीसांनी ठाकरेंना टोला लगावला. ते अकोला येथे सभेत बोलत होते.

 

देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) म्हणाले, उद्धव ठाकरे यांचे भाषण लिहिणारे स्क्रिप्ट रायटर शिंदे गटात गेले असावेत. त्यामुळे त्यांना काँग्रेस (Congress) आणि राष्ट्रवादीकडून (NCP) उधारीवर स्क्रिप्ट रायटर आणले आहेत. ते पुढे म्हणाले, उद्धवजी तुम्हाला कुठे कुठे आग होतेय हे तुम्हाला सहनही होत नाही आणि सांगताही येत नाही, हे आम्हाला समजतंय, अशा शब्दात फडणवीसांनी ठाकरेंच्या टीकेवर पलटवार केला. (Maharashtra Politics News)

 

‘मैं समंदर हूं लौटकर जरुर आऊंगा’

2019 साली भाजपच्या (BJP) पाठीत खंजीर खुपसून, बाळासाहेब ठाकरेंच्या (Balasaheb Thackeray) विचारांना तिलांजली देऊन तुम्ही खुर्चीच्या मोहानं काँग्रेस, राष्ट्रवादीकडे गेलात. त्यावेळी महराष्ट्राच्या विधानसभेत मी ठणकावून सांगितले होतं की, मेरा पाणी उतरता देख, मेरे किनारे पर घर मत बसना, मैं समंदर हूं लौटकर जरुर आऊंगा. मी परत तर आलोच शिंदेजींना देखील परत घेऊन आलो आहे, असं फडणवीस यांनी सांगितलं.

 

 

म्हणून उद्धव ठाकरेंचं दुकान बंद केलं

मला आठवतंय, बाळासाहेब ठाकरेंनी एकदा सांगितलं होतं. ज्यावेळी काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसबरोबर जाण्याची वेळ येईल, त्यादिवशी मी माझ्या शिवसेनेचं दुकान बंद करेन, पण त्यांच्याबरोबर जाणार नाही. मात्र उद्धव ठाकरे खुर्चीसाठी काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसबरोबर गेले. त्यामुळे आम्ही उद्धव ठाकरे यांचं दुकान बंद केलं आणि बाळासाहेब ठाकरेंचा पक्ष एकनाथ शिंदेंच्या (Eknath Shinde) नेतृत्वात पुन्हा जिवंत केला. जो हिंदुत्वासाठी आणि भारतवर्षामध्ये हिंदुत्वाचं जागरण करण्यासाठी शिवसेनेच्या (Shivsena) रुपाने मजबुतीने उभा आहे, असंही फडणवीस म्हणाले.

 

वटवृक्ष एकच असतो…

देवेंद्र फडणवीस पुढे म्हणाले, देशभरातील विरोधक पाटण्यात एकत्र येणार आहेत,
हातात हात घेणार आहेत आणि ‘मोदी हटाओ’च्या घोषणा देणार आहेत. आता त्यांच्यात एक नेता वाढला आहे.
तो म्हणजे उद्धव ठाकरे. मात्र कितीही वेली एकत्र आल्या तरी त्या वटवृक्ष होऊ शकत नाही.
वटवृक्ष एकच असतो त्याचं कुणीही वाकडं करु शकत नाही, असं फडणवीस म्हणाले.

 

Web Title : Devendra Fadnavis | devendra fadnavis criticized uddhav thackeray

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा