Devendra Fadnavis | जुनी पेन्शन का नको? फडणवीसांचे आवाहन म्हणाले- ‘इमोशनल नको, प्रॅक्टिकल व्हा’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – जुन्या पेन्शन योजनेवरुन (Old Pension Scheme) राज्याचे राजकीय वातावरण तापले आहे. कर्मचाऱ्यांकडून जुनी पेन्शन योजना लागू करण्याची मागणी करण्यात येत आहे. यावर आता देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी प्रतिक्रिया दिली आहे. जुनी पेन्शन योजना आपण आत्ता लागू केली तर आता काहीच फरक पडणार नाही. परंतु 2030 नंतर मात्र याचे परिणाम दिसायला सुरुवात होईल. मी लाँग टर्मचा विचार करत आहे. सध्या निवडणुका (Elections) डोळ्यासमोर ठेवून आम्ही निर्णय करणारी मंडळी नाहीत, असं देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी अधिवेशनात सांगितले.

देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) म्हणाले, ज्या राज्यांनी जुनी पेन्शन योजना लागू केली ते 2030 पर्यंत पैसे देतील. मात्र पुढे त्यांना शक्य होणार नाही. केंद्र पगारासाठी पैसे देत नाही केंद्र सरकार (Central Government) केवळ त्यांच्या योजनांसाठी पैसा देत असतं. ज्या राज्यांनी जुनी पेन्शन योजना लागू केली त्यांच्या राज्याचा रेव्हेन्यु इतका वाढणार नाही, असेही त्यांनी सांगितले.

2005 मध्ये राज्याची परिस्थिती बिकट होती त्यामुळे नवी पेन्शन योजना स्विकारण्यात आली. जगात जिथं पेन्शन स्किम आहे, ती नवीन पद्धतीनं लागू करण्यात आल्याचे पाहायला मिळते. प्रगत जगात जुनी पेन्शन स्कीम कुठेही लागू नाही. कर्मचाऱ्यांसोबत लोकांचेही कल्याण बघावं लागतं. विविध योजना राबवायच्या आहेत. जुन्या पेन्शन योजनेमुळे मोठा आर्थिक भार निर्माण होतो, असंही देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी बोलताना सांगितले.

चर्चेतून मार्ग निघेल

मी जुन्या पेन्शनच्या मुद्यावर सगळ्या संघटनांसी बोलायला तयार आहे. केवळ त्यांनी भावनिक होऊ नये.
त्यांनी टेक्निकल बाजू समजून घ्यावी. त्यांनी सरकारची बाजू समजून घेतली की हा विषय संपेल.
विरोधी पक्षाने इगो विषय करु नये. हा राज्याचा प्रश्न आहे. कर्मचारी संघटनांनी इगो विषय न करता चर्चेला यावे.
नुकतीच एका संघटनेनं संपाची नोटीस दिली आहे. मी त्यांना आव्हान करतो की, आम्ही चर्चेला तयार आहोत.
लोकशाहीत कर्मचारी आंदोलन करत आहेत आणि त्यामुळे विरोधकांना आनंद होत असेल तर हे योग्य नाही. भविष्यात राज्याची अर्थव्यवस्था योग्य राहावी यासाठी सर्वांनी बाबी समजून घ्यायला हव्यात. या विषयावर चर्चा करुन काय मार्ग काढता येईल यासाठी राज्य सरकार पुढाकार घेईल, असे फडणवीस यांनी सांगितले.

Web Title : Devendra Fadnavis | finance minister devendra fadnavis reaction on old pension

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Sangli Caste Issue | खत खरेदी करताना शेतकऱ्यांना जात विचारली? राज्य सरकारने केला खुलासा

Maharashtra Budget Session | सांगलीतील ‘जात’ प्रकारावरुन विधानसभेत खडाजंगी, मविआच्या आक्रमक नेत्यांना उत्तर देताना मुख्यमंत्र्यांनी लगावला टोला

Pune PMC Warje Multispeciality Hospital | वारजे मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल : ठेकेदारासाठी महापालिकेने कर्ज काढण्यास आमचा विरोध – खासदार सुप्रिया सुळे