Devendra Fadnavis | ‘महाराष्ट्र सरकारमधील जबाबदार मंत्र्यांनी राजीनामे द्यावेत’ – देवेंद्र फडणवीस

नागपूर : पोलीसनामा ऑनलाइन – Devendra Fadnavis | मध्यप्रदेशमधील ओबीसींच्या राजकीय आरक्षणाला (Madhya Pradesh OBC Political Reservation) हिरवा कंदील मिळाल्यानंतर महाराष्ट्रात राजकीय वातावरण चांगलंच तापू लागलं आहे. महाराष्ट्रातील ओबीसींच्या राजकीय आरक्षणावरुन भाजप (BJP) आणि महाविकास आघाडी सरकार (Mahavikas Aghadi Government) यांच्यात राजकीय शीतयुद्ध रंगताना दिसत आहे. यानंतर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.

 

देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) म्हणाले, ”मध्यप्रदेश सरकारने एम्पिरिकल डेटा तयार करून संपूर्ण अहवाल सर्वोच्च न्यायालयात सादर केला. सर्वोच्च न्यायालयाने (Supreme Court) त्यांना स्थानिक स्वराज्य संस्था निहाय अहवाल सादर करण्यास सांगितला. त्यांनी तोही अहवाल सादर केला आणि आज त्यानुसार त्यांना ओबीसी आरक्षणाची परवानगी मिळाली. तसेच, ओबीसी आरक्षणासाठी एम्पिरिकल डेटा सादर करा, असे आम्ही सुरवातीपासून सांगत होतो. पण, महाविकास आघाडीचे नेते केंद्र सरकारकडे (Central Government) बोट दाखविण्यात मग्न होते. वर्षभरानंतर मागासवर्ग आयोग नेमला. त्यांना निधीच दिला नाही. मध्यप्रदेशने लगेच मागासवर्ग आयोग नेमला होता,” असं ते म्हणाले.

 

पुढे बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले, ”महाविकास आघाडी सरकारने ओबीसी आरक्षणाची हत्या केली आहे. महाराष्ट्रात निव्वळ राजकारण झाले. मंत्रीच मोर्चे काढत राहिले आणि निव्वळ भाषणे करत राहिले. त्यामुळे महाराष्ट्रातील ओबीसी समाज राजकीय आरक्षणाला मुकला. आम्ही जेव्हा वारंवार सांगत होतो की, ट्रिपल टेस्ट करा. तेव्हा हेच नेते खिल्ली उडवत होते. आजचा सर्वोच्च न्यायालयाचा आदेश त्यांच्या डोळ्यात झणझणीत अंजन घालणारा आहे. मुख्यमंत्र्यांनी तर या प्रश्नात लक्षच घातले नाही, असा गंभीर आरोप त्यांनी केला. तसेच, आता सरकारमधील जबाबदार मंत्र्यांनी राजीनामा द्यावा,” असं फडणवीस म्हणाले.

 

Web Title :- Devendra Fadnavis | obc reservation supreme court opposition leader devendra fadnavis targets uddhav thackeray govt

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा