‘गोपीनाथ मुंडे प्रतिष्ठान’च्या माध्यमातून काम करण्याच्या पंकजा मुंडेंच्या निर्णयावर फडणवीसांनी दिली ‘ही’ मोठी प्रतिक्रिया

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – गोपीनाथ गडावरून पंकजा मुंडे यांनी आतापासून मी गोपीनाथ मुंडे प्रतिष्ठानच्या मार्फत काम करणार असल्याची घोषणा केली होती त्यानंतर आता भाजप नेतृत्व याला काय उत्तर देणार याकडे सगळ्यांचे लक्ष लागून होते. भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांनी पक्षाच्या मार्फतच काम करायला हवे असे मत देवेंद्र फडणवीस यांनी पंकजा मुंडे यांच्या निर्णयाबाबत व्यक्त केले आहे.

पंकजा मुंडे यांच्या निर्णयाने राजकीय वर्तुळात अनेक वेगवेगळ्या प्रकारच्या चर्चा सुरु झाल्या होत्या मात्र यावर आता देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्टीकरण दिले आहे. ते म्हणतात, प्रतिष्ठानचे काम कोणी करू नहे असे नाही परंतु जे भाजपचे काम आहे ते त्यांनी पक्षाच्या माध्यमातूनच केले पाहिजे असे स्पष्ट मत देवेंद्र फडणवीस यांनी एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत व्यक्त केले आहे. तसेच याबाबत आम्ही पंकजा मुंडे यांच्याशी अधिक चर्चा करू आमचे नेतेही त्यांच्याशी बोलतील आणि याबाबत पंकजा मुंडे यांचे म्हणणे समजून घेऊ असा विश्वास देखील फडणवीस यांनी यावेळी व्यक्त केला आहे.

काय म्हणाल्या होत्या पंकजा मुंडे नेमकं मेळाव्यात
आता माझ्याकडे कोणतेही पद नाही. मी आमदार देखील नाही त्यामुळे पक्षाने मला कोअर कमिटीतुन मुक्त करावे अशी मागणी गोपीनाथ गडावर झालेल्या मेळाव्यात पंकजा मुंडे यांनी केली होती.तसेच मी गोपीनाथ मुंडे यांच्या नावाने कार्यालय सुरु करून नवीन वज्रमूठ तयार करणार आहे, मी मशाल घेऊन ठिकठिकाणी राज्यभर दौरा करणार आहे असे म्हणत पुढील राजकीय कार्य गोपीनाथ मुंडे प्रतिष्ठानच्या मार्फत करणार असल्याची घोषणा पंकजा मुंडे यांनी यावेळी केली होती.

फेसबुक पेज लाईक करा : https://www.facebook.com/policenama/

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा. WhatsAPP

You might also like