देवेंद्र फडणवीस आज देणार मुख्यमंत्रीपदाचा ‘राजीनामा’ !

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – राज्यात कोणाचेही सरकार सत्तास्थानी येत असल्याचे दिसत नसतानाच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे आज आपल्या मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देण्याची शक्यता आहे. महाराष्ट्र विधानसभेची मुदत शनिवारी ९ नोव्हेंबरला संपत आहे. त्यामुळे त्याचे पद उद्या संपुष्टात येणार आहे.

त्यामुळे तांत्रिक बाजू पूर्ण करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना राजीनामा द्यावा लागणार आहे.
राज्यात स्थिर सरकार देण्याच्या दृष्टीने कोणत्याही पक्षाकडे बहुमताइतके संख्याबळ सध्या नाही. अल्पमतातील सरकार स्थापन न करण्याचा निर्णय भाजपाने घेतला आहे.

दुसरीकडे अडीच वर्षे मुख्यमंत्रीपदाबाबत शिवसेना तडजोडीस अजिबात तयार नाही. फक्त हे अडीच वर्षे सुरुवातीला की शेवटी याबाबत ते चर्चा करायला तयार आहेत. दुसरीकडे भाजपा शिवसेनेला मुख्यमंत्रीपद देण्यास तयार नाही. त्यामुळे ही कोंडी फुटण्याची शक्यता सध्या तरी नाही.

Visit : Policenama.com