Devendra Fadnavis | खातेवाटप झालं आता पालकमंत्रीपदाचं वितरण कधी?, देवेंद्र फडणवीस म्हणाले… (व्हिडिओ)

नागपूर : पोलीसनामा ऑनलाइन – नव्याने सरकारमध्ये सहभागी झालेल्या राष्ट्रवादीच्या आमदारांना (NCP MLA) मंत्रिपदाची शपथ देण्यात आली. मात्र त्यांना खातेवाटप करण्यात आले नव्हते. अखेर राज्यपालांनी खातेवाटपाला मंजूरी दिल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी खातेवाटप जाहीर केलं. यामध्ये अनेक महत्त्वाची खाती राष्ट्रवादीच्या नेत्यांना मिळाली. खातेवाटप झाल्यानंतर पालकमंत्रीपदाचं वितरण कधी होणार? असा प्रश्न उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांना विचारण्यात आला. यावर उत्तर देताना हा काही फार मोठा मुद्दा नसून आम्ही यावर चर्चा करु असे उत्तर दिले. देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) शनिवारी सायंकाळी नागपुरात माध्यमांशी बोलत होते.

 

यावेळी पालकमंत्रीपदाच्या वितरणावर बोलताना देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) म्हणाले, राज्यात खातेवाटप जसे सोप्या पद्धतीने झाले तसेच सर्वच जिल्ह्यात पालकमंत्र्यांची (Guardian Minister) नियुक्ती लवकरच सोप्या पद्धतीने केली जाईल. त्यात कुठलाही वाद नाही. मंत्रिमंडळ विस्तारही (Cabinet Expansion) लवकरच होणार आहे. विरोधी पक्षांनी त्यांची चिंता करु नये, असा खोचक सल्ला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिला.

 

 

खाते वाटप जसं अगदी सोप्यारितीने पार पडलं, तसं आमचं सगळंच सोपं होणार आहे.
तिन्ही पक्षांनी ठरवलं आहे की, एकत्रित काम करायचं आहे आणि महाराष्ट्राच्या हितासाठी काम करायचं आहे.
त्यामुळे कोणताही वाद होणार नाही, असं मला वाटतं. मविआप्रमाणे महायुतीत फूट पडू नये
यासाठी कोणती नवीन व्यवस्था केली आहे का? या प्रश्नाला उत्तर देताना देवेंद्र फडणवीस मिश्किल हसत म्हणाले,
अशी कोणतीही नवीन व्यवस्था तयार केली नाही. सगळ्या व्यवस्था जुन्याच आहेत.

 

Web Title :  Devendra Fadnavis | when guardian ministers will annouce devendra fadnavis statement

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा