शरद पवार यांना माझ्या खांद्यावरून बंदूक चालवाचीय : देवेंद्र फडणवीस

पोलीसनामा ऑनलाइन –  ‘राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांना माझ्या खांद्यावरून बांद्रयाच्या सिनिअर आणि बारामतीच्या ज्युनिअरवर बंदूक चालवायची आहे. आणि त्यांना सांगायचेय की बाबांनो काहीतरी करा..अशी टीका विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी शरद पवार यांच्यावर केली आहे.’

फडणवीस म्हणाले, मी विदर्भातील आहे त्यामुळे समुद्राची पाहणी करायला चाललो आहे असे ते म्हणाले, पण मी अनेकदा बारामतीत गेलो, तिथे मला समुद्र दिसला नाही. शरद पवार हे माझ्या वडिलांच्या वयाचे आहेत. माझे वडिल असते तर त्याच वयाचे असते. त्यामुळे मुलगा किती पुढे गेला तरी बापाला असे वाटते की त्याला कमी समजते. त्या भावनेतून शरद पवार बोलले असतील. असे त्यांनी सांगितले. देवेंद्र फडणवीस हे 11 आणि 12 जून असे दोन दिवस कोकणाचा दौरा करणार आहेत. या दोन दिवसांत रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्यांत विविध ठिकाणी ते भेटी देऊन नुकसानीची पाहणी करतील. यापूर्वी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी कोकण दौरा केला आहे. मी बारामतीसारख्या दुष्काळी भागातून येतो. देवेंद्र फडणवीस विदर्भातून येतात. समुद्राशी काहीही संबंध नाही. त्यामुळे ते येत आहेत तर चांगले आहे. प्रत्येकाला ही परिस्थिती समजेल, ज्ञानात भर पडेल. असे म्हणत शरद पवार यांनी फडणवीस यांच्यावर टीका केली होती. या टीकेला आता फडणवीस यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. पुन्हा एकदा फडणवीस आणि पवार या दोन नेत्यांमध्ये कलगीतुरा रंगल्याचे चित्र आहे.