Homeताज्या बातम्याDhananjay Munde | धनंजय मुंडेंवर गंभीर आरोप करणार्‍या करूणा शर्मांना 'या' कारणामुळं...

Dhananjay Munde | धनंजय मुंडेंवर गंभीर आरोप करणार्‍या करूणा शर्मांना ‘या’ कारणामुळं अटक

परळी : पोलीसनामा ऑनलाइन (Policenama Online) – राज्याचे सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांच्या होमग्राऊंडमध्ये करुणा शर्मा (Karuna Sharma) यांनी एंट्री करुन एकच खळबळ उडवून दिली. मात्र, त्यांच्या गाडीत पिस्तूल (Pistol) सापडल्यामुळे त्यांना अटक (Arrest) करण्यात आली आहे. धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांनी जबरदस्ती आणि बळाचा वापर करुन माझ्यावर खोटे गुन्हे दाखल केले आहेत. मला फसवण्याचा प्रयत्न करत आहेत. माझ्या गाडीत जबरदस्तीने रिव्हॉलव्हर ठेवली, असा आरोप करुणा शर्मा यांनी केली. त्यांना परळी पोलिसांनी (Parli police) अटक केली आहे.

परळी येथील वैजनाथ मंदिराच्या समोर दर्शनासाठी आल्यानंतर करुणा शर्मा यांची गाडी अडवून धक्काबुक्की करण्याचा प्रयत्न केला गेला होता. या नंतर खबरदारीची उपाययोजना म्हणून पोलीस प्रशासनाने त्यांना शहर पोलीस ठाण्यात (city police station) आणले. यावेळी त्यांच्या गाडीची झडती घेतली असता गाडीमध्ये पिस्तुल आढळून आले. यानंतर पोलिसांनी त्यांना अटक करुन वैद्यकीय तपासणीसाठी नेण्यात आले.

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

करुणा शर्मा परळीत येणार असल्याने शहरामध्ये पोलिसांचा मोठा बंदोबस्त ठेवण्यात आला होता.
करुणा शर्मा यांना मंदिराच्या समोर करुणा शर्मा यांना अडवले.
यावेळी परळी मधील महिला नेत्यांनी जाब विचारला यामुळे या ठिकाणी तणाव निर्माण झाला होता.
हे लक्षात येताच पोलिसांनी त्यांना मंदिराच्यासमोर रोड बाहेर काढून दिले.
पुन्हा मुंडे समर्थक आणि त्यांची गाडी आल्यानंतर पोलिसांनी त्यांना शहर पोलीस ठाण्यात नेण्यात आले.

करुणा शर्मा यांच्या गाडीत पोलिसांना पिस्तूल आढळून आल्यानंतर शर्मा यांनी गंभीर आरोप केले आहेत.
धनंजय मुंडे यांनी जबरदस्ती आणि दबाव टाकून माझ्या गाडीत पिस्तूल टाकली आणि माझ्या वरील खोटे गुन्हे दाखल केले आहेत.
धनंजय मुंडे यांनी जोर जबरदस्ती बळाचा वापर केला आहे, असा आरोप शर्मा यांनी केला आहे.

Web Title : Dhananjay Munde | karuna sharma arrested serious charges against dhananjay munde at parali of beed district

 

Honda Dream Yuga | 86 kmpl मायलेजची ही बाईक खरेदी करा 29 हजारात, मिळेल 1 वर्षाची वॉरंटी

National Nutrition Week 2021 | 20 ते 30 वयोगटातील तरूण-तरूणींनी आवश्य खाव्यात ‘या’ गोष्टी, वयाच्या हिशेबाने जाणून घ्या बेस्ट डाएट

Hinjawadi Crime | एटीएम बसवण्याच्या बहाण्याने 70-80 जणांची फसवणूक, कंपनीच्या डायरेक्टरसह 3 जणांविरुद्ध FIR 

Stay Connected
534,500FansLike
125,687FollowersFollow
61,453SubscribersSubscribe
Must Read
Related News