वशीकरण स्पेशालिस्ट, ‘तांत्रिक-मांत्रिक’ भाजपमध्ये असल्याचे म्हणत धनंजय मुंडेंचा राजनाथ सिंह यांच्यावर ‘निशाणा’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – राजनाथ सिंह यांनी दसऱ्याच्या मुहूर्तावर केलेली राफेलची शस्त्र पूजा चांगला वादाचा विषय ठरला आहे. लिंबू, नारळ, मीठ अशा पद्धतीने एक लढाऊ विमान भारतीय ताफ्यात सहभागी केल्यामुळे सोशल मिडियावर टीकेची झोड उठली. काँग्रेसनंतर आता राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे यांनी राफेल विमानाच्या पूजेवरुन सरकारवर निशाणा साधला. राफेल सारखे अत्याधुनिक तंत्रज्ञानाने परिपूर्ण विमान भारतीय ताफ्यात दाखल करताना सरकार अंधश्रद्धेला खतपाणी घालत असल्याची टीका धनंजय मुंडे यांच्याकडून भाजप सरकारवर करण्यात आली.

वशीकरण स्पेशालिस्ट, सर्व तांत्रिक-मांत्रिक भाजपाच्या चमूमध्ये दाखल झाले आहेत. आता आपल्या देशाला कोणाचीच नजर लागणार नाही असे धनंजय मुंडे यांनी म्हटले. अंधश्रद्धा निर्मूलन कायद्याची ऐशी तैशी झाल्याचा टोमणा धनंजय मुंडे मारला.

धनंजय मुंडे यांनी आपल्या ट्विटर हॅन्डलवरुन बुधवारी ट्विट करत म्हणले की अंधश्रद्धा निर्मूलन कायद्याची ऐशी तैशी ! देशाच्या रक्षणासाठी #Rafale आणलंय अन् राफेलच्या यशस्वी उड्डाणासाठी लिंबांचा उतारा ठेवला जातोय. वशीकरण स्पेशालिस्ट, सर्व तांत्रिक-मांत्रिक भाजपाच्या चमूमध्ये दाखल झाले आहेत. आता आपल्या देशाला कोणाचीही नजर लागणार नाही. या ट्विटमध्ये त्यांनी RafalePujaPolitics असा हॅशटॅगही वापरत सरकारवर निशाणा साधला.

आरे मधील झाडांची कत्तल झाल्याने फडणवीस सरकारवर जोरदार टीका होत आहे. उच्च न्यायालयाने वृक्षतोडीला विरोध करणारी याचिका शुक्रवारी फेटाळली. त्यानंतर प्रशासनाने एका रात्रीत 500 झाडे कापली. मध्यरात्री अशी अचानक झाडे तोडल्याने नागरिकांनी संताप व्यक्त केला. त्यानंतर धनंजय मुंडेंनीही भाजपवर टीका करत शिवसेनेवर देखील निशाणा साधला.

शिवसेनेने सत्तेत असतानाही कारशेडमधील झाडे तोडण्यास विरोध केला होता. एवढी झाडे तोडून झाल्यानंतरही शिवसेना पक्षप्रमुखांनी सत्ता आल्यावर बघू असे म्हटले, यावर धनजंय मुंडेनी टीकास्त्र साधले.

कार्यकारी अध्यक्ष म्हणतात, झाडे तोडणाऱ्यांचे काय करायचे, ते नव्याने सरकार आल्यानंतर ठरवू. खरे तर उद्धव ठाकरे यांचे नाव बदलून यू-टर्न ठाकरे असे ठेवायला पाहिजे. ते सत्तेपुढे लाचार होत सगळ्याच मुद्द्यावर ते यू-टर्न घेत असतात अशी बोचरी टीकाही धनंजय मुंडेंनी शिवसेनेवर आणि उद्धव ठाकरेंवर केली होती.

Visit : Policenama.com