IPS अधिकार्‍यांच्या बदल्यांना सुरूवात, धुळ्याचे पोलीस अधीक्षक विश्वास पांढरे यांची बदली, पंडीत यांची नियुक्ती

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – आयपीएस अधिकार्‍यांच्या सर्वसाधारण बदल्यांना सुरवात होण्यापुर्वीच आज (मंगळवार) गृह विभागाने धुळे जिल्ह्याच्या पोलिस अधीक्षकपदी नागपूर शहरमध्ये पोलिस उपायुक्त पदावर कार्यरत असलेल्या एका आयपीएस अधिकार्‍याची नियुक्ती केली आहे.
Vishvas Pandhre
धुळयाचे पोलीस अधीक्षक विश्वास पांढरे यांची बदली करण्यात आली असून त्यांच्या पदस्थापनेचे आदेश स्वतंत्रपणे काढण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले आहे. नागपूर शहर येथील पोलिस आयुक्तालयात उपायुक्त पदावर कार्यरत असलेले आयपीएस अधिकारी चिन्मय पंडीत यांची धुळ्याच्या पोलिस अधीक्षकपदी नियुक्ती करण्यात आली आहे.

You might also like