Diabetes | डायबिटीज कमी करतील ‘या’ 4 सोप्या एक्सरसाईज! वेगाने कमी होईल ब्लड शुगर

पोलीसनामा ऑनलाइन टीम – Diabetes | व्यायाम करणे प्रत्येकासाठी चांगले असते. पण जर एखाद्याला मधुमेहाची समस्या (Diabetes Problem) असेल तर त्याच्यासाठी व्यायाम (Exercise) करणे अधिक महत्त्वाचे ठरते. जर कोणाला डायबिटीज (Diabetes) असेल आणि तो व्यायाम करत असेल तर त्याचे मोठे फायदे होऊ शकतात. जसे रक्तातील साखर (Blood Sugar) आणि रक्तदाब (Blood Pressure) कमी करणे, ऊर्जा वाढवणे आणि चांगली झोप येण्यास मदत करणे (Increase Energy and Helps In Good Sleep) इत्यादी.

 

हार्वर्ड टी.एच. चॅन स्कूलच्या (Harvard T H Chan School) मते, टाइप 2 मधुमेह (Type 2 Diabetes) असलेल्या लोकांना व्यायामाचा खूप फायदा होतो. त्यामुळे या रुग्णांनी दररोज व्यायाम करावा. कोणत्या व्यायामामुळे मधुमेह कमी होण्यास मदत होते, ते जाणून घेवूयात (Let’s Know Which Exercises Help Reduce Diabetes).

 

ताज्या हवेत चालल्याने तणावाची पातळी कमी होते. ज्या व्यक्तीला मधुमेह (Diabetes) आहे आणि त्याने आठवड्यातून तीन-चार वेळा 30 मिनिटे चालले तर मधुमेह कमी होण्यास खूप मदत होऊ शकते.

 

1. डान्स (Dance)
जर एखाद्या व्यक्तीने आठवड्यातून 3 दिवस 25 मिनिटे नृत्य केले तर ब्लड शुगर आणि तणाव (Stress) कमी करण्यासाठी खूप मदत होऊ शकते. यासोबतच कॅलरीजही बर्न (Calories Burn) होतील, ज्यामुळे वजन कमी होण्यास मदत होईल. लठ्ठपणामुळे (Obesity) मधुमेहाचा धोका वाढतो.

 

2. पोहणे (Swimming)
पोहणे हा एरोबिक व्यायाम आहे. यामुळे शरीराच्या सांध्यावर भार पडत नाही. शरीराच्या वरच्या आणि खालच्या भागासाठी हा खूप चांगला व्यायाम आहे. थशलचऊ च्या मते, आठवड्यातून काही दिवस पोहण्याने कोलेस्ट्रॉल कमी होण्यास आणि मधुमेह कमी होण्यास मदत होते.

3. योग (Yoga)
एंडोक्राइनोलॉजी आणि मेटाबॉलिझममध्ये सप्टेंबर 2018 मध्ये प्रकाशित झालेल्या पुनरावलोकनानुसार, जेव्हा तणावाची पातळी जास्त असते,
तेव्हा तुमच्या रक्तातील साखरेची पातळी (Blood Sugar Level) देखील वाढते. योगासने केल्याने तणाव कमी होतो.
त्यामुळे मधुमेह असलेल्यांनीही तणाव कमी करण्यासाठी योगासने करावीत.

 

4. स्ट्रेंथ ट्रेनिंग (Strength Training)
स्ट्रेंथ ट्रेनिंग म्हणजे वेट ट्रेनिंग. जर एखाद्याने त्याच्या दैनंदिन दिनचर्येमध्ये स्ट्रेंथ ट्रेनिंग समाविष्ट केले तर त्याची ब्लड शुगर निश्चितच कमी होईल.
तसेच कॅलरी बर्न करण्यास आणि मसल्स मास वाढविण्यात मदत करू शकते.
तुम्ही जिममध्ये जाऊन स्ट्रेंथ ट्रेनिंग करू शकता किंवा घरबसल्या काही उपकरणे खरेदी करून त्यांच्यासोबत व्यायाम करू शकता.

 

 

फक्त आणि फक्त आरोग्याच्या (हेल्थ) बातम्यांसाठी ज्वाईन करा आमचा स्पेशल टेलिग्राम ग्रुप, फक्त क्लिक करा

 

(Disclaimer : वरील लेखामध्ये सांगितलेले विधी, पध्दती आणि दाव्यांचं आम्ही कुठलंही समर्थन करत नाही. त्यांना केवळ सल्ला म्हणून घ्यावं.
अशा पध्दतीच्या कोणत्याही उपचार / औषध / आहारावर अंमल करण्यापुर्वी डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.)

 

 

Web Title :- Diabetes | diabetes best exercises and easy ways to lower blood sugar levels naturally walking running weight training

 

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Sun Poisoning | उन्हाळ्यात उन्हामुळे होऊ शकते ‘सन पॉयझनिंग’, जाणून घ्या याची लक्षणे आणि बचाव

 

Breasts Sagging ची समस्या दूर करण्यासाठी 5 सोप्या आणि प्रभावी पद्धती

 

Knee Pain | तुमचे गुडघे आणि सांध्यांमध्ये वेदना होतात का? शास्त्रज्ञांनी शोधली नैसर्गिक पद्धत; जाणून घ्या