‘या’ व्यक्तीनं 2014 साली केलं होतं प्रियंका चोपडासोबत लग्न ? फोटो शेअर करत सांगितली ‘कहाणी’

पोलिसनामा ऑनलाइन –बॉलिवूड स्टार्सच्या क्रेझी चाहत्यांचे अनके किस्से आपण ऐकत असतो. अलीकडेच प्रियंका चोपडाशी संबंधित काही माहिती समोर आली आहे. एका व्यक्तीनं सोशल मीडियावरून याबाबात माहिती दिली आहे आणि सांगितलं आहे की त्यानं प्रियंका चोपडासोबत लग्न केलं होतं. त्यानं प्रियंकासोबतचा त्याचा एक फोटो शेअर केला आहे. तसं पाहिलं तर हे प्रकरण काही गंभीर नाही तर खूप विनोदी आहे. या व्यक्तीचं म्हणणं आहे की, त्यानं 2014 साली प्रियंकासोबत लग्न केलं होतं.

खरं तर ब्रँडन शुस्टर (Brandon Schuster) नावाच्या एका व्यक्तीनं प्रियंका चोपडाबद्दल एक पोस्ट शेअर केली आहे. ब्रँडनची ही पोस्ट अमेरिकन अॅक्ट्रेस ख्रिसी टायगन (Chrissy Teigen) हिनं ट्विटरवरून शेअर केली आहे. या दिसत आहे की, ब्रँडन प्रियंकासोबत आहे. तिच्या गळ्यात फुलांचा हार आहे. ती हसत हसत ब्रँडन सोबत बोलत आहे. या फोटोसोबत ब्रँडननं जो किस्सा सांगितला आहे तो विनोदी तर आहेच परंतु चकित करणाराही आहे.

ब्रँडननं सांगितलं की, 2014 मध्ये प्रियंका चोपडासोबत लग्न केलं होतं. मी ताम्पा मध्ये आयोजित केलेल्या एका इव्हेंटमध्ये तिचं स्वागत करण्यासाठी तिला दोन फुलांचे हार घातले होते. मला हे माहिती नव्हतं की, भारतीय संस्कृतीत याला लग्नाचं प्रतीक मानलं जातं. यानंतर भारतीय मीडियात गोंधळ उडाला होता. मी दुसऱ्या दिवशी एक्सक्लुसिव्ह इंटरव्ह्यु देत होतो.”

ब्रँडनची ही पोस्ट सध्या सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहे. ही पोस्ट पाहिल्यानंतर सारेच हैराण झाले आहेत. दरम्यान प्रियंका चोपडानं यावर कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही.