Diet & Aging | तुम्हाला वेगाने वृद्ध करतात खाण्याच्या ‘या’ 5 गोष्टी, जाणून घ्या

पोलीसनामा ऑनलाइन टीम – Diet & Aging | आपण कोणता आहार घेतो, आपली जीवनशैली कशी आहे आणि आहारातील खाद्यपदार्थ कशा प्रकारे बनवले जातात, त्यांच्यासाठी वापरण्यात येणार घटक कोणते असतात, यावर शरीराचे आरोग्य मोठ्या प्रमाणात अवलंबून असते. त्वचेवर सुद्धा याचा भरपूर परिणाम होत असतो. काही अशा वस्तू असतात ज्यांचा आहारात तुम्ही जास्त वापर करत असाल तर तुम्ही वार्धक्याकडे वेगाने वाटचाल करू लागता. (Diet & Aging)

 

हेल्थ एक्सपर्ट सांगतात की, खाण्याच्या काही गोष्टी त्वचेला वेळेपूर्वीच वृद्ध बनवतात. ज्यामुळे चेहर्‍यावर सुरकुत्या दिसू लागतात. जर तुम्हाला सुद्धा हेल्दी आणि ग्लोईंग त्वचा पाहिजे असेल तर काही वस्तू खाणे टाळले पाहिजे. या वस्तू कोणत्या ते जाणून घेवूयात…

 

फ्रेंच फ्राईज (French fries) –
फ्रेंच फ्राइज खुप चविष्ठ असतात. परंतु यामध्ये मीठ आणि तेल खुपच जास्त असते. हे मोठ्या तापमानावर बनवले जाते जे फ्री रॅडिकल्स येतात. यामुळे त्वचा खराब होते. फ्री रॅडिकल्स एजिंग प्रोसेसचा वेग वाढवते. जास्त मीठामुळे डिहायड्रेशन होते. यामुळे त्वचा सैल होते आणि सुरकुत्या लवकर पडतात.

 

साखर (Suger) –
मुरूमांची समस्या सर्वात जास्त साखरेमुळे होते. साखर कोलेजनचे नुकसान करणारे ग्लायकेशन एंडची निर्मिती करते. कोलेजन स्किन स्वच्छ ठेवते. यासाठी फळे खा. (Diet & Aging)

सोडा आणि कॉफी (Soda and coffee) –
सोडा आणि कॉफीमध्ये खुप जास्त कॅफीन आढळते. यामुळे चांगली झोप लागत नाही. हेल्थ एक्सपर्टनुसार, खराब स्लीपिंग पॅटर्नचा परिणाम त्वचेवर पडतो. डोळ्यांच्या खाली डार्क सर्कल आणि सुरकुत्या, झोप चांगली मिळत नसल्याने येतात. सोडा आणि कॉफीचे प्रमाण कमी करा. कॉफीऐवजी हळदीचे दूध प्या.

 

अल्कोहल (Alcohol) –
दारूमुळे त्वचेसंबंधी अनेक समस्या होऊ लागतात. त्वचा लाल होणे, सूज, कोलेजन कमी होणे इत्यादी समस्या होतात. दारू शरीरातील पोषकतत्व आणि व्हिटॅमिन ए कमी करते. सोबतच डिहायड्रेशन वाढवते.

 

या सर्व गोष्टी सुरकुत्या वाढवण्याचे काम करतात. त्वचा चमकदार आणि टाईट ठेवण्यासाठी व्हिटॅमिन ए आवश्यक आहे. अल्कोहलचे सेवन मर्यादित करा. पाणी भरपूर प्या.

 

जास्त आचेवर शिजवलेले जेवण (Meals cooked over high heat) –
कॉर्न किंवा सनफ्लॉवर ऑईलसारख्या काही पॉलिअनसेच्युरेटेड तेलात ओमेगा-6 फॅटी अ‍ॅसिड जास्त मात्रेत असते.
हे सूज आणि फ्री रेडिकल्स वाढवण्याचे काम करते.
जर तुम्ही दररोज या तेलात जास्त आचेवर जेवण शिजवत असाल तर यामुळे तुमची त्वचा वेगाने खराब होते.

 

त्वचेला हायड्रेट ठेवण्यासाठी मोनो अन सॅच्युरेटेड फॅटचा पर्याय निवडा.
तुम्ही व्हेजिटेबल ऑईलचा सुद्धा वापर करू शकता.
यामध्ये अँटीऑक्सिडेंट, व्हिटॅमिन ई आणि फायटोस्टेरॉल जास्त असते जे इन्फ्लेमेशन कमी करते.

 

Web Title :- Diet & Aging | worst foods that speed up your aging process potential swaps diet

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

Katrina Kaif | ‘या’ अभिनेत्याचा वाईट वागणुकीमुळं सलमान खान समोर रडली कतरिना, जाणून घ्या कोण होता तो अभिनेता?

Rakesh Jhunjhunwala | राकेश झुनझुनवाला यांनी ‘या’ स्टॉकमधून 1 आठवड्यात गमावले 753 कोटी रुपये; तुम्ही तर घेतला नाही ना?

LPG Cylinder Booking | गॅस सिलेंडर बुक करण्यास विसरलाततर नो-टेन्शन; कंपनी पाठवेल ‘अलर्ट’, जाणून घ्या