विमान प्रवास करून येणार्‍यांसाठी बोर्डिंग पास हाच डिजीटल Pass म्हणून ग्राह्य धरणार : पुणे पोलिस

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन –   देशाआंतर्गत विमानप्रवास सुरू झाल्यानंतर दिल्ली येथून उड्डाण घेतलेले विमान पुण्यातील लोहगाव विमानतळावर आले. दरम्यान विमानतळावर जाण्यासाठी खासगी वाहनाचा उपयोग करणाऱ्याना प्रवाशाना स्वतंत्र पासची गरज नसून, प्रवाशांकडील बोर्डिंग पास हाच डिजीटल पास म्हणून ग्राह्य धरला जाणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले. त्यासाठी स्वतंत्र पासची आवश्यकता नाही.

देश कोरोनामुळे गेली दोन ते अडीच महिन्यापासून कडेकोट लॉकडाऊन होते. तर आस्थापनासोबतच पूर्ण वाहतूक व्यवस्था देखील बंद केली होती. तसेच 25 मार्चपासून देशातील विमान वाहतूक बंद होती. मात्र अनेक घडामोडीनंतर अखेर 24 मे रोजी मध्यरात्रीनंतर राज्य सरकारच्या परवानगीनंतर देशातंर्गत विमान वाहतूकीचा मार्ग मोकळा झाला. त्यानंतर दिल्ली, बंगळुरू, अहमदाबाद, चेन्नई या शहरांसाठी विमाने सुरु झाली. त्यानुसार आज पुण्यात दिल्लीतून विमान आले.

दरम्यान, शहरात नागरिकाना प्रवास करणाऱ्या प्रवाशांना विमानतळावर खासगी वाहनाने जावे किंवा यावे लागते. मात्र शहरात प्रवास करण्यासाठी पोलिसांच्या डिजीटल पासची आवश्यक लागू आहे. त्यामुळे शहरातून कुठे जायचे असल्यास हा पास काढावा लागत असे. पण विमानसेवा सुरू झाल्याने आता विमान प्रवाशांनी विमानतळापर्यंत ये-जा करण्यासाठी त्यांच्या खासगी वाहनाचा वापर केल्यास त्यांना स्वतंत्र पास देण्याची गरज नाही, त्यांच्याकडे असणारा बोर्डिंग पास हाच डिजीटल पास म्हणून ग्राह्य धरला जाईल, असे गुन्हे शाखेचे पोलिस उपायुक्त बच्चन सिंग यांनी सांगितले.