डिजिटल माध्यमाद्वारे होणार अध्यक्षाची निवड ! कॉंग्रेसचा ऐतिहासिक निर्णय

ADV

नवी दिल्ली : वृत्तसंस्था –  कॉंग्रेसने आता आपल्या पक्षाचा आगामी अध्यक्ष हा डिजिटल माध्यमाद्वारे निवडण्याचा ऐतिहासिक निर्णय (Digital Voting in Congress President Election) घेतला आहे. नुकतीच याची घोषणा पक्षाकडून करण्यात आली आहे. त्यानंतर ऑल इंडिया काँग्रेस कमिटी (AICC) च्या सदस्यांकडून डिजिटल आयडी कार्ड उपलब्ध करून देण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. निवडणुकीत निवडून येणारा नेता पक्षाच्या सध्याच्या अध्यक्ष सोनिया गांधी यांची जागा घेणार आहे. काँग्रेसच्या अध्यक्षाचा कालावधी दोन वर्षांचा राहणार आहे.

पक्षातील ‘सेंट्रल इलेक्शन अथॉरिटी’ मतदारांची यादी बनवण्याचे काम सुरू आहे. अथॉरिटीकडून स्टेट युनिटसकडे एआयसीसी प्रतिनिधींचा डिजिटल फोटो मागवण्यात आला आहे. जवळपास 1500 प्रतिनिधी या निवडणुकीत सहभागी होणार आहेत. विरोधकांकडून राहुल गांधी यांच्यासाठी एका नव्या मंचाची तयारी केली जात असल्याचे सांगण्यात आले आहे. परंतु, अध्यक्ष पदाच्या निवडणुकीत राहुल यांच्याऐवजी इतर कुणी उभे राहिले तर उत्सुकता नक्कीच ताणली जाणार आहे.

ADV

काँग्रेसच्या काही नेत्यांच्या म्हणण्यानुसार, राहुल गांधी हेच पुन्हा एकदा पक्षाचे अध्यक्ष म्हणून निवडून आले तर ते केवळ निर्विवाद नेता नाहीत, तर सर्वात लोकप्रिय नेतेदेखील आहेत, असा संदेश जनतेपर्यंत पोहाेचू शकतो. अध्यक्षपदाच्या दावेदारांत वाढ झाली तर सेंट्रल इलेक्शन अथॉरिटीला ही संपूर्ण निवडणूक प्रक्रिया वेळेतच पूर्ण करावी लागणार आहे. यात बॅलेट मतदानाचाही समावेश आहे. दोन राज्य सोडून देशातील इतर सर्व राज्यांतील प्रतिनिधींची यादी आमच्यापर्यंत पोहाेचली आहे.

निवडणुकीची सगळी तयारी पूर्ण झाल्यानंतर त्याची काँग्रेस अध्यक्षांना देण्यात येणार असल्याचे निवडणुकीशी निगडित नेत्याने सांगितले. एआयसीसी प्रतिनिधींची यादी 2017 प्रमाणेच असून, त्यात काही बदल आणि सुधारणेचे काम सुरू आहे. यंदा प्रत्येक प्रतिनिधिच्या आयडी कार्डवर एक बारकोडही राहणार आहे. त्यावर, प्रत्येक मतदात्याची संपूर्ण माहिती असेल. लवकरच हे पक्षाचे मतदार कार्ड नेत्यांना पाठवले जाणार आहे. 2017 साली राहुल गांधी यांची पक्षाचे अध्यक्ष म्हणून निवड केली होती. मात्र, राहुल गांधी यांनी स्वत: राजीनामा दिल्यानंतर सोनिया गांधी यांच्याकडे पुन्हा ही जबाबदारी सोपवण्यात आली आहे.