मॉब लिंचिंग प्रकरण : ४९ दिग्गजांचे पंतप्रधान मोदींना पत्र ; मणिरत्नम यांचं हस्ताक्षर ‘खोटं’ !

नवी दिल्ली : वृत्संस्था – देशात गेल्या अनेक दिवसांपासून मॉब लिंचिंगच्या घटना समोर येत आहेत. यात अनेकांनी आपली जीव गमावला आहे. यानंतर आता देशातील विविध क्षेत्रातील ४९ लोकांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना पत्र लिहिले आहे. यामध्ये देशातील वंशवाद आणि जातीय, धार्मिक हिंसेमुळे नाराजी व्यक्त करण्यात आली आहे. या पत्रामुळे आता वाद होताना दिसत आहे. या पत्रात अनेक मोठ्या व्यक्तींची नावे आहेत. परंतु यातील एका व्यक्तीच्या हस्ताक्षराला घेऊन वाद होण्याची शक्यता आहे.

प्रसिद्ध दिग्दर्शक मणिरत्नम यांचेही या पत्रात नाव असल्याचे समोर आले आहे. परंतु मणिरत्नमच्या टीमने मात्र या वृत्ताचे खंडन केले आहे. मणिरत्नम यांनी अशा कोणत्याही पत्रावर हस्ताक्षर केलेले नाही असे टीमने म्हटले आहे. टीमने असंही सांगितलं आहे की, “मणिरत्नम सध्या त्यांच्या आगामी सिनेमाच्या निर्मितीमध्ये व्यस्त आहे.” टीमच्या म्हणण्यानुसार, मोदींना पाठवलेल्या कोणत्याही पत्रावर हस्ताक्षर असणे तर दूरच परंतु असे कोणते पत्र सपोर्टसाठीही त्यांच्याकडे आलेले नाही.

पंतप्रधानांना लिहिलेल्या पत्रात साहित्य, सिनेमा, इतिहास आणि कला क्षेत्रातील ४९ लोकांची हस्ताक्षरे आहेत. यात अदूर गोपालकृष्णन, रामचंद्र गुहा, अनुराग कश्यप यांसारख्या दिग्गज नावांचा समावेश आहे. आता मणिरत्नम यांनी आपले हस्ताक्षर पत्रावर नसल्याचे म्हटल्याने यानंतर या पत्रामुळे वाद होऊ शकतो.

मोदींना लिहिलेल्या पत्रात नेमकं काय आहे ?

पत्रात नावे असणाऱ्या सर्वांनी नरेंद्र मोदींकडे मागणी केली आहे की, मॉब लिंचिंगच्या घटनांना आळा घालण्यासाठी कठोर कायदा करण्यात यावा आणि आरोपींना कडक शिक्षा करण्यात यावी. आपलं संविधान भारताला धर्मनिरपेक्ष असल्याचं सांगतं. येथे प्रत्येक धर्म, समूह, लिंग, जात असलेल्या लोकांना समान अधिकार आहे. या पत्रात अशी मागणी करण्यात आली आहे की, दलित, मुसलमान आणि इतर अल्पसंख्याकांच्या लिंचिंगला आळा घालण्यात यावा.

आरोग्यविषयक वृत्त –