Mohanji Prasad Death : बॉलिवूडला आणखी एक झटका ! डायरेक्टर मोहनजी प्रसाद यांचं निधन

पोलीसनामा ऑनलाइन – डायरेक्टर मोहनजी प्रसाद (Mohanji Prasad) यांचं मंगळवारी निधन झालं आहे. प्रसाद यांनी राम बलराम, घर परिवार, औरत तेरी यही कहानी असे अनेक हिट सिनेमे दिले आहेत. अभिनेत्री मीनाक्षी शेषाद्री (Meenakshi Seshadri) यांना घेऊन त्यांनी औरत तेरी यही कहानीमधून त्यांनी डायरेक्शनला सुरुवात केली होती. 90 वर्षीय मोहनजी प्रसाद दीर्घकाळापासून कोलकात्यात राहात होते. तिथंच त्यांनी अखेरचा श्वास घेतला.

फेमस फिल्म प्रोड्युसर सुनील बूबना (Sunil Bubana) यांनी सांगितलं की, मोहनजी प्रसाद आपल्यात राहिले नाहीत. भोजपुरी सिनेमात संवेदनशील आणि कौटुंबिक सिनेमे बनवण्यासाठी त्यांना स्मरलं जाईल. सिनेमात त्यांचं योगदान अतुलनीय आहे. मीनाक्षी शेषाद्री व्यतिरिक्त त्यांनी ऋषी कपूर (Rishi Kapoor), राजेश खन्ना आणि करिश्मा कपूरसारख्या स्टार्ससोबत सिनेमात काम केलं आहे. राजेश खन्ना यांचा घर परिवार हा सिनेमा त्यांनीच प्रोड्युस केला होता. याशिवाय सिनेमाचं लेखन आणि दिग्दर्शन त्यांनीच केलं होतं.

1989 साली बडे घर की बेटी सिनेमातून त्यांनी लेखन करिअरची सुरुवात केली होती. या सिनेमात ऋषी कपूर, प्राण, कादर खान लिड रोलमध्ये होते.

You might also like