संतापजनक ! मृत कोरोना रूग्णाच्या खिशातील 35 हजार रूपये घेतले काढून

धुळे : पोलीसनामा ऑनलाइन –  देशात कोरोनाने थैमान घातले आहे. कोरोना संकटात लढण्यासाठी काहीजण मदतीसाठी सर्वस्व अर्पण करत आहेत. तर काहीजण संधीचे सोन म्हणून मिळेल ते घेण्यासाठी माणुसकीची लक्तरे वेशीवर टांगत आहे. असाच प्रकार धुळे शहरातील वाडीभोकर येथील खासगी रुग्णालयात दिसून आला आहे. कोरोनाबाधित रुग्णाचा मृत्यू झाल्यानंतर रुग्णालयात कार्यरत कर्मचारी मयताच्या खिशातील 35 हजाराची रोकड आणि आभूषणे काढत असल्याचे सीसीटीव्हीत कैद झाले आहे. ही महिती रुग्णालय प्रशासनाला दिली असता त्यांनी घडलेला प्रकार झाकण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप मयताच्या नातेवाईकांनी केला आहे.

नातेवाईकांनी रुग्णालय प्रशासनाला जाब विचारला असता उडवाउडवीची उत्तर देण्यात आली. घडलेल्या प्रकाराबाबत सर्वत्र संताप व्यक्त होत असून देवरूपी मंदिरात उपचारासाठी येणाऱ्या रुग्णाची अशी फसवणूक होत असेल तर विश्वास कोणावर ठेवायचा असा प्रश्न रुग्णांच्या नातेवाईकांनी केला. संबधित रुग्णालय व चोरी करणा-या कर्मचा-यावर कारवाई करावी, अशी मागणी नागरीक करत आहेत.