24 वर्षीय अभिनेत्याचा संशयास्पद मृत्यू ! पोलिसांचा तपास सुरू

पोलीसनामा ऑनलाईन टीम :  हॉलिवूड अ‍ॅक्टर सेबॅस्टियन अ‍ॅथी याचा संशायस्पद मृत्यू झाला आहे. सेबॅस्टियन अ‍ॅथी हा अवघ्या 24 वर्षांचा होता. एका इंग्रजी वृतानुसार पोलीस त्याच्या मृत्यूचा तपास करत आहेत. त्याच्या मृत्यूचं कारण अद्याप समोर आलेलं नाही. डिज्नी चॅनलनं ट्विटरवरून सेबॅस्टियनच्या मृत्यूची बातमी दिली आहे.

डिज्नी चॅनलनं ट्विट केलंय की, “आरआयपी सेबॅस्टियन. तू तुझ्या जबरदस्त अभिनयाच्या जोरावर सर्वांचंच मन जिंकलंस. तुझं असं अचानक आम्हाला सोडून जाणं धक्कादायक आहे. तुझा अभिनय, तुझं हासणं, तुझा दिलदारपणा कायम स्मरणात राहिल. ईश्वर तुझ्या आत्म्याला शांती देवो, हीच प्रार्थना.” असं म्हणत डिज्नीनं त्याला श्रद्धांजली वाहिली आहे. डिज्नीनं केलेलं ट्विट स्पॅनिश भाषेत आहे.

सेबॅस्टियनच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं स्पॅनिश मनोरंजन क्षेत्रातील तो प्रसिद्ध अभिनेता होता. वन्स या मालिकेमुळं तो घराघरात पोहोचला होता. ही मालिका O11CE या नावानंही ओळखली जाते. आपल्या पहिल्याच मालिकेतून तो एक फेमस अ‍ॅक्टर झाला होता. यात त्यानं लोरेंजो ग्वेरा ही भूमिका साकारली होती.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
WhatsAPP
You might also like