काँग्रेसमध्ये इच्छुकांची गर्दी ! लवकरच होणार मुलाखती

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – लोकसभा निवडणुकीत झालेल्या दारुण पराभवानंतर काँग्रेसने विधानसभा निवडणुकीसाठी कंबर कसली आहे. लोकसभा निवडणुकीत काँग्रेसला राज्यात दारुण पराभव स्वीकारावा लागला होता. राज्यात अवघ्या एका जागेवर त्यांना विजय मिळवता आला होता. तो देखील शिवसेनेतून प्रवेश केलेल्या आमदाराने मिळवलेल्या विजयामुळे त्यांची शून्यावर येण्याची नाच्चकी टळली.

या पराभवानंतर काँग्रेसने प्रदेशाध्यक्षपदी देखील नव्याने नियुक्ती केली. लोकसभा निवडणुकीत पराभूत झालेल्या अशोक चव्हाण यांची उचलबांगडी करत बाळासाहेब थोरात यांची या पदावर नियुक्ती केली आहे.
यानंतर आता बाळासाहेब थोरात हे मोठ्या प्रमाणात ऍक्टिव्ह झाले असून त्यांनी विधानसभेसाठी इच्छुक असलेल्या उमेदवारांची मुलाखती घेण्यास सुरुवात केली आहे. विधानसभेसाठी काँग्रेसकडे आतापर्यंत ९०० जणांनी अर्ज केले असून लवकरच त्यांच्या मुलाखती घेण्यात येणार आहेत.

यासाठी २९ ते ३१ जुलै दरम्यान या मुलाखती होणार असल्याची माहिती प्रदेश सरचिटणीस अ‍ॅड. गणेश पाटील यांनी दिली आहे. राधाकृष्ण विखे पाटील यांच्यासारख्या मातब्बर विरोधी पक्षनेत्याने देखील पक्ष सोडल्याने काँग्रेसला पुन्हा नव्याने उभारी देण्याचे आव्हान बाळासाहेब थोरात यांच्यापुढे आहे. ज्या इच्छुकांना निवडणूक लढवायची आहे त्यांनी यासाठी मोठ्या प्रमाणात अर्ज नेले असून खुल्या प्रवर्गासाठी १५ हजार रुपये तर मागासवर्गीयांसाठी १० हजार रुपये अनामत रक्कम देखील जमा करण्यास सांगितले आहे. संपूर्ण महाराष्ट्रातून यासाठी ९०० अर्ज आले आहेत.

दरम्यान, या निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीबरोबर देखील चर्चा सुरु असल्याची माहिती काँग्रेसच्या गोटातून मिळत आहे. त्यामुळे आता काँग्रेस त्यांना बरोबर घेते कि नाही आणि विधानसभा निवडणुकीत किती ताकदीने उतरते हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

आरोग्यविषयक वृत्त –