#DiwaliSpecial: ‘असे’ बनवा रव्याचे लाडू ! तोंडात टाकताच ‘विरघळतील’

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – दिवाळीमध्ये चकली, चिवडा, करंजी, लाडू असे अनेक खमंग पदार्थ बनवले जातात. काहींना लाडूची प्रचंड आवड असते. यात बेसनाचे आणि रव्याचे लाडू असतात. अनेकांना रव्याचे लाडू खूप आवडतात. आपण आज रव्याचे लाडू कसे बनवायचे याबाबत जाणून घेऊयात.

साहित्य-
रवा
ओलं खोबरं एक वाटी
पाणी
वेलची पूड
तूप
मावा
एक वाटी साखर

कृती-
– कढई गॅसवर ठेवून त्यात दोन चमचे तूप घ्यावं. तूप वितळण्याची वाट पहा. यानंतर रवा खरपूस भाजून घ्या.
– यानंतर गॅस बंद करा. रवा प्लेटमध्ये काढून घ्या आणि थंड करा.
– यानंतर पुन्हा गॅस सुरु करा. कढई तापल्यानंतर त्यात एक वाटी ओलं खोबरं आणि एक वाटी साखर तसेच तीन चमचे पाणी घालून तयार झालेलं मिश्रण साखर वितळेपर्यंत एकजीव करून घ्या.
– या मिश्रणात मावा एकत्र करून घ्या. त्यानंतर यात ड्रायफ्रूट्स आणि चवीनुसार वेलची पूड एकत्र करून घ्या.
– यानंतर पुन्हा गॅस बंद करा. यानंतर तयार मिश्रणात खरपूस भाजलेला रवा घाला.
– यानंतर तयार झालेल्या मिश्रणाचे लाडू वळून घ्या.

यानंतर तुम्ही तोंडात टाकले तरी विरघळतील अशा लाडूंचा आनंद घेऊ शकता.

Visit : Policenama.com