Diwali 2020 : दिवाळीला 17 वर्षांनंतर असा योग, जाणून घ्या शुभ मुहूर्त आणि पूजाविधी

पोलीसनामा ऑनलाइन टीम  –    दिवाळीचा सण कार्तिक महिन्याच्या कृष्ण पक्षाच्या अमावस्या तिथीला साजरा केला जातो. ग्रहांच्या विषेश योगामुळे यावेळची दिवाळी खास आहे. दिवाळीला शनी स्वाती योगातून सर्वार्थ सिद्धी योग बनत आहे. ज्योतिषाचार्य विशाल अरोरा यांच्यानुसार दिवाळीला 17 वर्षांनंतर आलेला सर्वार्थ सिद्धी योग खूपच लाभदायक आहे.

ग्रहांचा योग :

दिवाळीला धन आणि ज्ञानचा कारक गुरू ग्रह आपल्या स्वत:ची रास धनू, शनी अणि मकरमध्ये राहील, तर शुक्र ग्रह कन्या राशीत राहील. ज्योतिषाचार्यांचे म्हणणे आहे की, दिवाळीला असा योग 499 वर्षांनंतर होत आहे. यापूर्वी ग्रहांची अशी स्थिती 1521 मध्ये होती.

शुभ मुहूर्त :

दिवाळीला सायंकाळी 5 वाजून 30 मिनिटांपासून सायंकाळी 7 वाजून 07 मिनिटांपर्यंत प्रदोष काळ राहील. या काळात पूजा करणे खूप शुभ मानले गेले आहे. यानंतर निशीथ काळ पूजा मुहूर्त रात्री 08 वाजल्यापासून रात्री 10.50 वाजेपर्यंत राहील. 10 वाजून 33 मिनिटांपासून रात्री 12 वाजून 11 मिनिटांपर्यंत अमृत मुहूर्त असेल, ज्यामध्ये तुम्ही कनक धारा स्तोत्राचा पाठ, श्री सूक्त पाठ करू शकता.

लाभ मुहूर्त :

दिवाळीला सायंकाळी 5 वाजून 38 मिनिटे ते 7 वाजून 16 मिनिटांपर्यंत लाभ मुहूर्त लागेल. या दरम्यान, दान, धर्म इत्यादी कामे खूप शुभ मानली जातात. या दरम्यान केलेल्या कुशल कामांचा लाभ व्यक्तीला दीर्घकाळापर्यंत मिळतो. यापूर्वी सकाळी 11 वाजून 44 मिनिटांपासून दुपारी 12 वाजून 27 मिनिटांपर्यंत अभिजित मुहूर्त आहे.

पूजा साहित्य :

कमळावर बसलेली लक्ष्मी माता, श्री गणेशाची मूर्ती, कमळ आणि गुलाबाची फुले, कडधान्याची पाने, रोली, कुंकू आणि केसर, तांदूळ, सुपारी, फळे, मिठाई, दूध, दही, मध, अत्तर आणि गंगाजल, कलावा, बत्ताशे, पितळेचा दिवा आणि मातीचे दिवे, तेल, तूप आणि कापसाची वात, कलश, एक नारळ, चांदीचे नाणे, लाल किंवा पिवळ्या रंगाचे आसन आणि चौरंग.

कशी कराल पूजा :

स्कंद पुराणानुसार कार्तिक अमावस्येच्या दिवशी सकाळी स्नान इत्यादी करून सर्व देवी-देवतांची पूजा करावी. सायंकाळी देवघरात माता लक्ष्मी आणि श्री गणेशाच्या मूर्ती एका चौरंगावर स्वस्तिक बणवून स्थापन करा. पूजेच्या स्थानावर रुपया, सोने किंवा चांदीचे नाणे जरुर ठेवा.

मूर्त्यांच्या समोर एक पाण्याने भरलेला कलश ठेवा. यानंतर मूर्तींसमोर बसून हातात जल घेऊन शुद्ध मंत्राचे उच्चारण करत मूर्ती, कुटुंबातील सदस्य आणि घरातील सदस्यांवर शिंपडावे. आता फळे, फूल, मिठाई, दूर्वा, चंदन, तूप, मेवा, खीर, बत्ताशे, कलश, फुलांची माळ इत्यादी साहित्यांचा वापर करत पूजाविधीने लक्ष्मीमाता आणि श्री गणेशाची पूजा करा.

यासोबतच देवी सरस्वती, भगवान विष्णू, काली माता आणि कुबेर यांचीही विधिवत पूजा करा. पूजा करताना 11 छोटे दिवे आणि एक मोठा दिवा लावा. पूजेनंतर अंगणात दिवा लावा. लक्षात ठेवा या दिवशी घरातील कोणत्याही कोपर्‍यात अंधार नसावा.