मुहूर्त ट्रेडिंगवर ‘उसळला’ शेयर बाजार, नशीब चमकवण्यासाठी गुंतवणुकदारांनी लावला ‘डाव’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन  –  शनिवारी भारतीय शेयर बाजार बंद असतो, परंतु दिवाळीच्या मुहूर्तावर आज बाजार काही वेळासाठी खुला झाला होता. दिवाळीच्या दिवशी भारतीय शेयर बाजारात मुहूर्त ट्रेडिंग सेशनचे आयोजन केले जाते. संवत वर्ष 2077 च्या सुरूवातीच्या दिवशी शनिवारी विशेष मुहूर्त व्यवहाराच्या प्रारंभी मुंबई शेयर बाजाराचा निर्देशांक 381 अंकानी तेजीसह आपल्या सर्वकालिन उंचीवर पोहचला.

सायंकाळी 6.15 वाजता खुला झाला बाजार

व्यवहाराच्या पहिल्या काही मिनिटीतच 30 शेयर्सवर अधारित मुंबई शेयर बाजाराचा निर्देशांक 380.76 अंक किंवा 0.88 टक्केच्या तेजीसह 43,823.76 अंकाच्या उंचीवरपर्यंत पोहचला. अशाच प्रकारे, एनएसईचा निफ्टी निर्देशांक 117.85 अंक किंवा 0.93 टक्के वाढून 12,808.65 अंकाच्या आपल्या नव्या विक्रमी उंचीवर होता. मुंबई स्टॉक एक्सचेंजमध्ये ‘मुहूर्त ट्रेंडिंग’ सेरेमनीच्या दरम्यान अभिनेत्री अथिया शेट्टी उपस्थित होती.